Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नवी सांगवीत गुंतवणुकीच्या नावाखाली ११ लाखांची फसवणूक

पिंपरी  : नवी सांगवी परिसरात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ११ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ८ एप्रिल २०२३ ते ८ मार्च २०२६ या कालावधीत गणेश पॅलेस, समर्थ नगर, नवी सांगवी येथे घडली.

फिर्यादी प्रतीक संजय तोडमल (वय २९, रा. गणेश पॅलेस, नवी सांगवी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी प्रवीण विठ्ठल काटकर (वय ३३, रा. गणेश पॅलेस, समर्थ नगर, नवी सांगवी) याने शेअर मार्केटमधील पी.के. प्रॉफिट ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा १० ते २० टक्के नफा मिळेल व एका वर्षानंतर मूळ रक्कम परत केली जाईल, असे आमिष दाखवले.

हेही वाचा –  पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजित चौधरी; डॉ. योगेश म्हसे यांची बदली

या आमिषाला बळी पडून फिर्यादी यांनी आरोपीकडे २ लाख ५० हजार रुपये गुंतवले. तसेच दीपक लोंढे यांच्याकडून ५ लाख रुपये आणि अक्षय सुतार यांच्याकडून ३ लाख रुपये अशी एकूण ११ लाख रुपयांची रक्कम गुंतवण्यात आली. मात्र, आश्वासनाप्रमाणे नफा अथवा मूळ रक्कम परत न करता आरोपीने आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button