Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका निवडणूक : उमेदवारी अर्ज सादरीकरणासाठी आज अखेरचा दिवस

पिंपरी-चिंचवड | महापालिका निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आज मंगळवार (दि. ३०) अखेरचा दिवस आहे. विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रभागनिहाय रॅली, मिरवणुका आणि पदयात्रांच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

सोमवार (दि. २९) रोजी एकूण ३२५ उमेदवारांकडून ६९६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे सर्व आठ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांच्या परिसरात कार्यकर्ते व समर्थकांची मोठी गर्दी उसळली होती. आज अखेरचा दिवस असल्याने अर्ज भरण्यासाठी आणखी मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मंगळवार (दि. २३) पासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली होती. अखेरच्या टप्प्यात अनेक उमेदवारांनी कुटुंबीय, कार्यकर्ते आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज सादर केले. प्रभागातील प्रमुख रस्त्यांवरून काढलेल्या रॅलींमध्ये महिला-पुरुष, ज्येष्ठ नागरिक, तरुणाई आणि लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. तिरंगा किंवा केशरी फेटे, पक्षांचे मफलर व निवडणूक चिन्हे परिधान केलेले कार्यकर्ते मतदारांशी संवाद साधताना दिसत होते.

हेही वाचा        :                ‘सर्व घुसखोरांना देशाबाहेर हाकलणार’; अमित शहा

या शक्तिप्रदर्शनामुळे काही भागांत वाहतूक कोंडी निर्माण झाली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. अनेक उमेदवारांनी मुख्य उमेदवारीसोबतच काळजी म्हणून कुटुंबातील सदस्य किंवा जवळच्या कार्यकर्त्यांच्या नावाने अतिरिक्त अर्जही दाखल केले आहेत.

महापालिकेच्या नोंदीनुसार, आतापर्यंत पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी २,५२१ उमेदवारांकडून एकूण ५,९६१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

पुढील निवडणूक कार्यक्रम..

  • छाननी : बुधवार (दि. ३१)
  • वैध उमेदवारी यादी : छाननीनंतर प्रसिद्ध
  • उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत : शुक्रवार (दि. २), दुपारी ३ वाजेपर्यंत
  • चिन्ह वाटप व अंतिम यादी : शनिवार (दि. ३)
  • प्रचार कालावधी : १४ जानेवारीपर्यंत
  • मतदान : १५ जानेवारी

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button