Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डास प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत महापालिकेकडून दंडात्मक कारवाईला गती

पिंपरी : डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने डास निर्मूलनाच्या उपाययोजना अधिक तीव्र करण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे आणि उप आयुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्यापक मोहीम राबवण्यात येत आहे.

औषध फवारणीसह घरांची व कंटेनर तपासणी, भंगार दुकाने, बांधकामस्थळांची पाहणी, तसेच जनजागृती आणि दंडात्मक कारवाई यावर भर देण्यात येत आहे.

महानगरपालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमार्फत समन्वय साधून करण्यात आलेली कारवाई…

घरांची तपासणी : एकूण २ लाख ७० हजार ८८५ घरांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ५ हजार १७२ घरांच्या परिसरात डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याचे आढळून आले.

कंटेनर तपासणी : १४ लाख ४६ हजार ४५३ कंटेनरपैकी ५ हजार ६४१ कंटेनरमध्ये डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याचे आढळून आले.

भंगार दुकाने – ७१७ भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली.

बांधकाम स्थळे – ९८० बांधकाम स्थळांची तपासणी करून त्यामध्ये अस्वच्छता व पाणी साचल्याचे निदर्शनास आले.

नोटीस व दंड – २ हजार १९६ ठिकाणी नोटीस बजावण्यात आल्या असून २५२ नागरिक व आस्थापनांवर थेट दंडात्मक कारवाई करत ७ लाख इतकी दंडाची रक्कम वसूल करण्यात आली.

हेही वाचा –  नाराज आमदारांना मिळणार दिलासा? महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला

डेंग्यू प्रतिबंधासाठी विविध जनजागृती उपक्रम:

नियमित औषध फवारणी

घरोघरी माहितीपत्रकांचे वितरण

शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जनजागृती प्रशिक्षण

प्रभागस्तरावर विशेष जनजागृती कार्यक्रम

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिमा

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून डेंग्यू मलेरियाचा नायनाट करण्यासाठी जनजागृती करण्याबरोबरच, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी औषध फवारणी, तपासण्या आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी या उपक्रमात सहकार्य करून आपल्या परिसरातील स्वच्छता राखून या व्यापक मोहिमेस सहकार्य करावे.

शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

डेंग्यू आणि मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून सर्व स्तरांतून उपाययोजना केल्या जात असून, नागरिकांनी देखील स्वच्छता राखावी तसेच आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस म्हणून पाळावा.

सचिन पवार, उप आयुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button