ताज्या घडामोडीराष्ट्रिय

विमानातूनच कमी भाड्यात प्रवास, LAT एयरोस्पेस छोट्या शहरात देणार सेवा

12 ते 24 आसनांची छोटी विमाने बनवणार

राष्ट्रीय : येत्या काही दिवसात विमान प्रवास इतका सोपा होणार आहे की जणू बसप्रवासच हवाई सेवा आता केवळ मोठ्या शहरांची मक्तेदारी राहणार नाही. तर प्रत्येकासाठी त्याच्या शहरात उपलब्ध होणार आहे. एव्हीएशन स्टार्टअप LAT एयरोस्पेस कंपनीची अशी काही भारतात करण्याची इच्छा आहे. या कंपनीत झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी गुंतवणूक केलेली आहे.

LAT एयरोस्पेसच्या को-फाऊंडर सुरभी दास यांनी झोमॅटोचे सीईओ दीपिंदर यांच्या गुंतवणूकी संदर्भातील बातमी लिंक्डईन पोस्टवर दिलेली आहे. सुरभी दास झोमॅटोत चीफ ऑपरेटींग ऑफीसर म्हणून तिने काम केले आहे.बातम्यानुसार LAT एअरोस्पेसने ५० दशलक्ष डॉलर म्हणजेच ४१७ कोटींचा फंड जमा केला आहे. त्यातील २० दशलक्ष डॉलर म्हणजे १६७ कोटी रुपये स्वत: झोमॅटोचे सीईओ दीपिंदर यांनी दिले आहेत.

हेही वाचा – ‘आलमट्टी धरण उंचीवाढीला विरोधाची महाराष्ट्राची भूमिका ठामपणे मांडणार’; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

छोट्या शहरांना विमानाने जोडणार
या स्टार्टअपचा हेतू विमान प्रवास सोपा आणि स्वस्त करण्याचा आहे. हा एव्हीएशन स्टार्टअप छोटी शहर आणि विभागांना (टिअर 2 आणि टिअर 3 शहरं ) विमान सेवेने जोडणार आहे. सुरभी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहीलंय की, जेव्हा आम्ही झोमॅटोसाठी भारत विमानाने फिरायचो तेव्हा आम्हाला प्रश्न पडायचा की भारतात प्रादेशिक विमान प्रवास एवढा कठीण, महाग आणि कमी का आहे?’

12 ते 24 आसनांची छोटी विमाने बनवणार
कंपनीने आता 12 ते 24 आसनांची छोटे शॉर्ट टेकऑफ अँड लँडींग (STOL) एअरक्राफ्ट बनविण्याचा निर्णय घेतला आहे. जे छोट्या-छोट्या एअर थांब्यांवरुन सेवा पुरवणार आहेत. जे लोकांच्या घराजवळ असतील आणि ना बॅगेज बेल्ट,ना सिक्युरिटी चेकींगची लांब लाईन असे काही नसणार. लोक बसला बसतात तसेच चालत येतील आणि उड्डाण घेतील. हा प्रवास 1500 Km पर्यंतचा असेल. जो भारताची भौगोलिक आणि लोकसंख्या पाहून तयार केलेला असेल.

450 हून अधिक धावपट्ट्या,पण केवळ 150 चा वापर
भारतात सध्या ४५० हून अधिक धावपट्ट्या आहेत. परंतू त्यातील केवळ १५० वरच कमर्शियल उड्डाणे होत आहेत. म्हणजे देशाच्या दोन तृतीयांश एव्हीएशन क्षमतेचा वापरच केला जात नाहीए. दुसरीकडे टीअर २ आणि टीअर ३ च्या शहरात राहणारे लाखो लोक रस्ता वा ट्रेनने तासन् तास , तर कधीकधी दिवसभर प्रवासात वेळ खर्च करत आहेत. कारण त्यांच्यासाठी स्वस्त आणि काही मिनिटांनी असणारी हवाई सेवा उपलब्ध नाही. LAT एअरोस्पेसचे मिशन या शहरांना जोडण्याचे आहे. कंपनी तिची टीम वाढवण्याची तयारी करीत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button