शालेय राष्ट्रीय वुशू स्पर्धेत कु. पार्थ तांबेरे यांचा कांस्यपदकाने गौरव
शिक्षण विश्व: राजमाता जिजाऊ शिक्षण संस्थेचा मान व अभिमान अधिक वाढला

पिंपरी-चिंचवड : श्रीनगर (जम्मू-काश्मीर) येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय राष्ट्रीय वुशू क्रीडा स्पर्धेत भोसरी येथील राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालय, लांडेवाडीचा विद्यार्थी कु. पार्थ तांबेरे (इ. ११ वी विज्ञान) याने उल्लेखनीय कामगिरी करत १७ वर्षाखालील ७५ किलो वजन गटात कांस्यपदक पटकावले.
गतवर्षीही पार्थने या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पदकाची कमाई करून आपले कौशल्य सिद्ध केले होते. या वर्षीही त्याने उत्कृष्ट खेळ कौशल्य आणि चिकाटीच्या जोरावर पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर भोसरीचे नाव उज्ज्वल केले. पार्थला या यशासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
हेही वाचा – भरतनाट्यम अरंगेत्रम सोहळ्यात वेदिका, अनन्या, नित्या, जुही यांचा मनमोहक नृत्याविष्कार
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व भोसरीचे प्रथम आमदार मा. श्री. विलासराव लांडे साहेब यांनी पार्थचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिं.चिं.मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री. अजितभाऊ गव्हाणे, संस्थेचे सचिव श्री. सुधीरभाऊ मुंगसे, नगरसेवक व विश्वस्त विक्रमदादा लांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.जी. कानडे, उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. नेहा बोरसे, रजिस्ट्रार सौ. अश्विनी चव्हाण, तसेच विभागप्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा. योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस, प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी पार्थचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
या यशामुळे राजमाता जिजाऊ शिक्षण संस्थेचा मान व अभिमान अधिक वाढला असून, पार्थ तांबेरे भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
कु. पार्थ तांबेरे याने दाखवलेले कौशल्य, मेहनत आणि जिद्द खरोखरच प्रेरणादायी आहे. अशा तरुण खेळाडूंमुळे आपल्या भोसरीचा आणि संस्थेचा अभिमान वाढतो. आमच्या संस्थेमार्फत अशा गुणवंत विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत, प्रोत्साहन आणि प्रशिक्षणाची उत्तम सुविधा देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. भविष्यात पार्थसारख्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताचा तिरंगा फडकवावा, हीच अपेक्षा आहे.
– विलास लांडे, अध्यक्ष, राजमाता जिजाऊ शिक्षण संस्था.





