Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खा. शरद पवार यांच्या हस्ते भोसरी हॉस्पिटलच्या आयसीयु मधील 16 बेड्सचे लोकार्पण

पिंपरी –पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन भोसरी रूग्णालयातील आयसीयू विभागाकरीता कॅप जेमिनी कंपनीने सीएसआर फंडातून दिलेल्या १६ बेडसचे लोकार्पण खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. कंपनीने अडीच कोटींचे साहित्य रुग्णालयाकडे सुपूर्त केले. त्याचे लोकार्पण करण्यात आले. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या कार्यक्रमास खासदार डॉ.अमोल कोल्हे, स्थायी सभापती ऍड. नितीन लांडगे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगरसेवक अजित गव्हाणे, रवी लांडगे, विक्रांत लांडे, नगरसेविका अनुराधा गोफणे, सारिका लांडगे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, कॅप जेमिनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद शेटटी, ‍सहाय्यक आयुक्त राजेश आगळे, अण्णा बोदडे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, डॉ.निलेश ढगे, आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. कॅप जेमिनी कंपनीतर्फे महानगरपालिकेस १० आयसीयू यूनीट, ६ व्हेन्टीलेटर, १० मोनिटर, १० सिरींज पंप, १० बेड साईड लॉकर, हाय पॉवर एक्सरे मशीन, सोनोग्राफी मशीन, दोन बायोमेडीकल वेस्ट कंटेनर, वॉटर प्यूरीफायर, आदी सुमारे २ कोटी ५० लाखाचे साहीत्य सीएसआर फंडातून सुपुर्द करण्यात आले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button