Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिशन विधानसभा : राजकारणात चऱ्होली गाव आमदार महेश लांडगेंसाठी ‘लकी’

भोसरी विधानसभा निवडणूक: सर्वपक्षीय ग्रामस्थांसह समर्थकांची लांडगेंसाठी विजयी वज्रमूठ

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
भोसरी विधानसभेतील आमदार महेश लांडगे यांनी चऱ्होलीचे ग्रामदैवत श्री वाघेश्वर महाराज मंदिरात प्रचाराचा नारळ फोडाला. विशेष म्हणजे, २०१९ मध्ये चऱ्होलीत प्रचार करतानाच लांडगे यांच्या विधानसभा निवडणूक उमदेवारीची घोषणा झाली होती. २०२४ मध्येसुद्धा योगायोगाने चऱ्होलीतील ग्रामस्थांच्या बैठकीत असतानाच भाजपा महायुतीचा उमेदवार म्हणून लांडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

२०१९ मध्ये पहिल्यांदा भाजपाच्या तिकीटावर लढणारे महेश लांडगे यांनी विजय मिळवला होता. आता त्याच चऱ्होलीमधून मताधिक्य मिळेल आणि २०२४ मध्येसुद्धा आमदार लांडगे विजयी होतील, असा निर्धार चऱ्होलीकरांनी केला. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदार संघातील वातावरण फिरले आहे. किंबहुना, चऱ्होली आमदार लांडगे यांच्यासाठी राजकीयदृष्टया ‘लकी’ आहे, अशी चर्चा पंचक्रोशीत आहे.

२०१७ मध्ये भाजपाच्या सत्ताकाळात भाजपाचे पहिले व समाविष्ट गावांतील पहिले महापौरपद नितीन काळजे यांच्या रुपाने देण्यात आले. त्यामुळे चऱ्होलीसह परिसरात आतापर्यंतचे सर्वाधिक बजेट चऱ्होलीवर खर्च करण्यात आले. तळागाळात विकासाची गंगा आली. १० वर्षांत चऱ्होली गावचे रुपडे पालटले. त्यामुळे ग्रामस्थ आणि चऱ्होलीकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

महायुतीची उमेदवारी घोषित झाल्यानंतर चऱ्होलीतील ग्रामस्थांनी आनंद साजरा केला. चऱ्होलीतील सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे पदाधिकारी सचिन तापकीर यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रभावीपणे संघटन केले आहे. त्यांनी स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि सोसायटीधारकांचा विश्वास संपादन करीत आमदार लांडगे यांच्या पाठिशी यंत्रणा उभी केली आहे.

चऱ्होलीत मताधिक्य निश्चित…

सोसायटीधारकांच्या विविध समस्या सोडवण्यासह चऱ्होलीतील विकास आराखड्यानुसार मंजूर रस्ते, ड्रेनेजलाईन, वीज समस्या यासह पाणी पुरवठ्याच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून सचिन तापकीर यांनी सातत्त्याने पुढाकार घेतला. त्यामुळे या भागात आमदार लांडगे यांच्या पाठिशी सर्वसामान्य नागरिकांची मोठी ताकद उभा राहणार आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात सचिन तापकीर यांनी मोठ्या ताकदीने आव्हान निर्माण केले. त्यामुळे चऱ्होलीतून २०२४ च्या निवडणुकीत आमदार लांडगे मताधिक्य घेतील, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button