breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी, २ कोटी रूपयांच्या खंडणीची मागणी

Salman Khan | अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी आली आहे. आरोपीने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली असून दोन कोटी रुपये न दिल्यास सलमानला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. वाहतूक पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावर ही धमकी देण्यात आली. याप्रकरणी वरळी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

File photo of Bollywood actor Salman Khan | Image source: ANI

अभिनेता सलमान खानला यापूर्वीही अशा प्रकारे धमकी देण्यात आली होती. मुंबई वाहतूक पोलिसांच्या मदत क्रमांकावर धमकीचा संदेश आला असून संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई टोळीतील वाद मिटवण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी झारखंडमधील एका २४ वर्षीय भाजी विक्रेत्याला वरळी पोलिसांनी अटक केली होती. आरोपीने टीव्ही पाहून सलमानला धमकवण्याचा कट रचून वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी आणखी एक संदेश पाठवून आरोपीने माफीही मागितली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button