Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्त होणार? बीसीसीआयने दिले मोठे संकेत

Rohit Sharma | गेल्या काही काळापासून धावांच्या दुष्काळाशी आणि फॉर्मशी झगडत असलेल्या रोहित शर्माचे भारतीय एकदिवसीय संघातील स्थान धोक्यात आले आहे. इंग्लंडविरुद्ध येत्या १९ जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर होणारा तिसरा एकदिवसीय सामना हा रोहितच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतील अखेरचा सामना ठरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या इंग्लंड मालिकेनंतर भारतीय संघ रोहित शर्माशिवाय पुढे जाण्याचा विचार करत असल्याचे समजते.

‘बीसीसीआय’च्या (BCCI) अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती आता आगामी २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी (World Cup 2027) संघ बांधणी करत आहे. या भविष्यातील योजनांमध्ये रोहितच्या वाढत्या वयामुळे आणि फॉर्ममुळे त्याच्या भूमिकेबाबत निवड समिती साशंक आहे. समिती आता यशस्वी जैस्वालसारख्या अत्यंत प्रतिभावान आणि फॉर्मात असलेल्या युवा सलामीवीराला संघात कायमस्वरूपी संधी देण्यास उत्सुक आहे.

हेही वाचा

‘स्थायी’चा प्रभारी पदभार स्वीकारताच मोशी दुर्घटनेतील कामगारांना श्रद्धांजली, सभा तहकूब

प्रशिक्षक गंभीर आणि रोहितसोबत झाली चर्चा

या गंभीर मुद्द्यावर गेल्या आठवड्यात निवड समितीचे मुख्य अध्यक्ष अजित आगरकर, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती आहे. “निवड समितीने रोहितला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, इंग्लंड दौऱ्यानंतरच्या भविष्यातील योजनांमध्ये त्याचा समावेश नाही. रोहितला स्वतःच्या तंदुरुस्तीवर (Fitness) अधिक काम करून एकदिवसीय क्रिकेट खेळणे सुरू ठेवायचे होते. मात्र, आता निवड समितीने सन्मानजनक निवृत्तीचा अंतिम निर्णय घेण्याची पूर्ण जबाबदारी स्वतः रोहितवरच सोपवली आहे,” असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने सांगितले.

गिलकडे आधीच सोपवलेय कर्णधारपद

रोहित शर्माने भारताला ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकून दिल्यानंतर २९ जून २०२४ रोजी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर मे २०२५ मध्ये त्याने कसोटी क्रिकेटलाही अलविदा केला. निवड समितीने गेल्या वर्षीच रोहितला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवून युवा फलंदाज शुभमन गिलकडे ही धुरा सोपवली होती. आता निवड समिती रोहितबाबत आणखी एक कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याने, लॉर्ड्सवरील सामना रोहितच्या चाहत्यांसाठी भावूक ठरणार हे निश्चित.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button