संत साई विद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

पिंपरी चिंचवड : आज दिनांक २७/०२/२०२६ रोजी शाळेच्या प्रांगणात मराठी राजभाषा गौरव दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभागातर्फे करण्यात आले या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.
मराठी दिन हा कुसुमाग्रज (वि .वा. शिरवाडकर )यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. या कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन श्री भागवत वानखेडे सर यांनी केले. कार्यक्रमात विद्यार्थिनी आराध्या उत्तुरे हिने गायलेल्या “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” या गीताने झाली. यानंतर मराठी भाषेच्या शिक्षिका सौ शुभांगी सुतार यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना भाषा म्हणजे काय हे पटवून दिले. केंद्र सरकारने मराठी भाषेचे प्राचीनत्व आणि समृद्धी लक्षात घेऊन तिला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला आहे.
हेही वाचा – वाहतूक कोंडी होणाऱ्या मार्गांचे सर्वेक्षण

या कार्यक्रमात नंतर इयत्ता सातवी ची विद्यार्थिनी श्रावणी देवकर हिने अभंग गायन केले तसेच इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी तनिष्का रसाळ सातवीतील अन्वी फुगे व स्वामिनी घोडेकर यांनी स्वरचित कवितांचे वाचन केले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री शिवलिंग ढवळेश्वर सर यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली. या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता ढवळेश्वर, विश्वस्त पायल ढवळेश्वर, सौ. रुपाली खोल्लम मॅडम, सौ. भारती ढवळेश्वर मॅडम, मनोज वाबळे सर, विठ्ठल पुंडे सर, संजय अनार्थे सर, अक्षय राणे सरयांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षिका स्वाती गोसावी यांनी केले .कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.
प्रमोद शिंदे
(शिक्षक प्रतिनिधी)




