Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

वाहतूक कोंडी होणाऱ्या मार्गांचे सर्वेक्षण

पुणे : महत्त्वाकांक्षी प्रस्तावित येरवडा-कात्रज बोगदा प्रकल्पांतर्गत वाहतूक कोंडी होणाऱ्या मार्गांचे सर्वेक्षण करून पर्यायांची चाचपणी करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी तशी सूचना केली आहे.

शहरातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी येरवडा-कात्रज हा महत्त्वाकांक्षी बोगदा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पासंदर्भात पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाची (पुम्टा) बैठक विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी होते. बैठकीत ‘मोनार्क’ या सल्लागार संस्थेकडून बोगदा प्रकल्पाचा ‘व्यवहार्यता अहवाल’ सादर करण्यात आला. त्यानुसार चर्चा करून सुधारित प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर करण्याचे या वेळी निश्चित करण्यात आले.

हिंजवडी, सिंहगड, येरवडा आणि कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खडी मशीन या चार ठिकाणीही कोंडी होत आहे. हिंजवडी ते सिंहगड, हिंजवडी ते येरवडा, येरवडा ते कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खडी मशीन चौक अशा तीन चार ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे, असे निरीक्षण सल्लागार कंपनीने बैठकीत नोंदविले आहे. त्यानुसार कोणत्या मार्गावर भूमिगत बोगदा करता येईल याबाबत सुचविले आहे.

हेही वाचा –  ‘मराठीला ज्ञान भाषेत रूपांतरित करून पुढील पिढीपर्यंत नेऊया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सल्लागार कंपनीने सुचविलेल्या मार्गावरील वाहतूक कोंडीबाबत ‘पुम्टा’तील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एकमत होऊ शकले नाही. स्वारगेट, सिंहगड रस्ता, कात्रज येथे वाहतूक कोंडी होत असल्याचे निरीक्षण काही अधिकाऱ्यांकडून नोंदविण्यात आले. त्यामुळे केवळ व्यवहार्यता अहवालाच्या आधारे प्रकल्प अंतिम करणे योग्य ठरणार नाही, अशी चर्चाही या बैठकीत झाल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. त्यामुळे आणखी कोणत्या मार्गावर वाहतूक कोंडी किती आणि कशी होते याची मूळ माहिती घेऊन पर्यायी मार्गांची चाचपणी करण्याची सूचना डाॅ. पुलकुंडवार यांनी केली.

पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा मार्ग सोडविण्यासाठी नेमक्या कोणत्या मार्गांवर वाहतूक कोंडीची सुरुवात आणि शेवट होतो आहे त्या मार्गांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात येणार असून, त्याबाबत सर्वेक्षण करून त्याचे सुधारित सादरीकरण करण्याच्या सूचना सल्लागार कंपनीला देण्यात आल्या आहेत. वाहतूक कोंडीचे मार्ग अंतिम झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर त्याबाबत सादरीकरण करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button