Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘महायुतीचे सरकार महिला सशक्तीकरणासाठी कटिबद्ध’; आमदार अश्विनी जगताप

चिंचवड : ‘लाडकी बहीण योजना’ ही राज्यातील महायुतीच्या सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेद्वारे महिलांना आर्थिक मदत मिळत असून त्यांना सक्षम करण्यासाठी या योजनेंतर्गत निधीचा मोठा फायदा होत आहे. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असून महायुतीचे सरकार महिला सशक्तीकरणासाठी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन आमदार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केले.

चिंचवड विधानसभेतील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ पिंपळे गुरव येथे महिलांचा भव्य मेळावा संपन्न झाला. यावेळी आमदार अश्विनी जगताप यांनी महिलावर्गाला संबोधित करत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी माजी महापौर शकुंतला धराडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक सागर आंघोळकर, शशिकांत कदम, माजी नगरसेविका उषा मुंडे, पल्लवी जगताप, शोभा जगताप, रविना सागर आंघोळकर, युवा नेते महेश जगताप यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा     –        लातूर शहरात ‘डॉ. अर्चना पाटील चाकूरकर’ “जायंट किलर” ठरणार ? 

याप्रसंगी महिलांना मार्गदर्शन करताना आमदार अश्विनी जगताप यांनी ‘उज्ज्वला योजना’चे महत्त्व पटवून दिले. गरीब महिलांना स्वयंपाकाचा गॅस मिळाल्यामुळे त्यांच्या आरोग्याचे रक्षण आणि स्वयंपाकात सुलभता वाढली असल्याचे नमूद केले. तसेच, ‘सुकन्या समृद्धी योजना’द्वारे मुलींच्या शिक्षण व विवाहासाठी आर्थिक मदत होत असल्याचे सांगितले. महिला बचत गटांना प्रोत्साहन देत त्यांनी महिलांना स्वावलंबनाची प्रेरणा दिली. महिलांच्या आरोग्यासाठी सुरु केलेल्या योजनांबद्दल बोलताना, त्यांनी प्रामुख्याने ‘प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना’, ‘मिशन इंद्रधनुष’ यांचा उल्लेख करत महिलांच्या आरोग्याचे संरक्षण सरकारकडून कसे होत आहे हे पटवून दिले. अश्विनी जगताप यांनी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाचं महत्त्व सांगत मुलींसाठी शिक्षण कसे महत्वाचे आहे हे सांगितले. मुलींचा जन्मदर व शिक्षणाचं प्रमाण वाढवणे हे महायुती सरकारचं उद्दिष्ट असून, ‘प्रधानमंत्री जनधन योजना’ अंतर्गत महिलांनी स्वतःचं बँक खाते उघडून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

या मेळाव्याच्या शेवटी आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या की, “महायुती सरकार आपल्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी भक्कम उभं आहे, आणि चिंचवडमधील बहिणींच्या हितासाठी शंकरभाऊ जगताप कटिबद्ध आहेत.” म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पिंपळेगुरव मधील लाडक्या बहिणींचा शंकरभाऊ जगताप यांना आमदार करण्याचा निर्धार..!

पिंपळे गुरव परिसरातील तब्बल साडेपाच हजारांहून अधिक महिलांना मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. आमदार अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांच्या सहकार्यामुळेच या योजनेचा लाभ आम्हा महिलांना मिळत आहे. म्हणूनच शंकरभाऊ जगताप यांना आम्ही मोठे मताधिक्य देऊन आमदार करणारच असा निर्धार यावेळी उपस्थित महिलांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button