Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

लातूर शहरात ‘डॉ. अर्चना पाटील चाकूरकर’ “जायंट किलर” ठरणार ?

मिशन विधानसभा : काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख यांच्यासमोर तगडे आव्हान

लातूर | लातुर भाजप हा सतत कॉंग्रेससोबत तडजोड करत आलाय असा आजपर्यंत इतिहास राहिलाय. यात विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे यांची मैत्री तर सर्वांनाच ठाऊक आहे. याच मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री ‘विलासराव देशमुख’ यांनी तब्बल पाच वेळा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व केलंय. त्यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा पुढे अमित देशमुख नेत आहेत. त्यांनी या मतदारसंघांचं जवळपास १५ वर्षे प्रतिनिधित्व केलंय. असंही सांगितलं जातं की, देशमुख यांच्या विरोधात भाजपनं सतत कमी ताकदीचा उमेदवार दिल्यानं त्यांचा विजय सोप्पा होत गेलाय.. मात्र यंदा या मतदारसंघातील सर्वच राजकीय चित्र बदलून गेलंय.. कारण भाजपनं यावेळी अमित देशमुख यांच्या विरोधात तगडा उमेदवार शोधलाय.. स्वत: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडलाय.. त्यामुळे मागचा पुढचा हिशोब यावेळी पुर्ण चुकता करणार अशी चर्चा मतदारसंघात सुरूय… अमित देशमुखांच्या विरोधात भाजपने कुणाला उभं केलंय..? हा उमेदवार कॉंग्रेसचा हा बालेकिल्ला भेदणार का ? त्याचाच हा आढावा….

विलासराव देशमुखांपासून ते अमित देशमुखांपर्यंत लातूर शहर मतदारसंघावर कॉंग्रेसचं एकहाती वर्चस्व राहिलंय..२००९, १०१४, आणि २०१९ अशा सलग तीन वेळा अमित देशमुखांनी या मतदारसंघात कॉंग्रेसचा ‘पंजा’ चालवलाय.. २००९ साली त्यांचा सामना बहुजन समाज पार्टीचे कय्युमखान मोहम्मदखान पठाण यांच्यासोबत होता. त्यावेळी शिवसेनेने श्रीपाद कुलकर्णींना मैदानात उतरवलं होतं. मात्र त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. २०१४ आणि २०१९ अशा दोन वेळा भाजपनं ‘शैलेश लाहोटीं’ना तिकीट दिलं. मात्र त्यांनाही अमित देशमुख यांनी छोबीपछाड दिलाय.. यानंतर देशमुखांच्या विरोधात सोयीचा उमेदवार दिला जातो, त्यामुळेच त्यांचा विजय सोप्पा होतो, असं बोललं जात होतं…

मात्र यंदा भाजपनं त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा केलाय… माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून डॉ.अर्चना पाटील चाकूरकर यांना भाजपकडून संधी दिलीय.. शिवराज पाटील चाकूरकर हे कॉंग्रेसचे.. मात्र अर्चना पाटलांना आपल्याच पक्षात घेऊन भाजपने कॉंग्रेसच्याच विरोधात मोठी खेळी केलीय… अर्चना पाटलांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळी खुद्द देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. चंद्रशेखर बावनकुळे तसेच इतर नेत्यांनीही त्यांचं पक्षात जोरदार स्वागत केलंय… मध्यंतरी त्या लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होत्या. यासाठी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेली होती.. मात्र त्यांना लोकसभेत संधी मिळाली नाहीय.. त्यानंतर आता लातूर शहर मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिलीय…

हेही वाचा      –      ‘मुंबईतीली प्रवास, वीज अदानींमुळे महाग’; प्रकाश आंबेडकरांचा आरोप 

माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच लिंगायत मतांचा लाभ अर्चना पाटलांना मिळेल असा अंदाज व्यक्त केला जाऊ लागलाय.. अशातच माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच लिंगायत मतांचा लाभ त्यांना मिळेल असंही बोललं जात आहे..अशातच लातूर शहरातील पाणीपुरवठ्याचा दीर्घकालीन प्रश्न आजही प्रलिंबत आहे. उजनी प्रकल्पाच्या माध्यमातून लातूरला पाणीपुरवठा करण्याचे मुद्दे हाती घेतलेय. तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाहीय.. त्याशिवाय, स्थानिक विमानतळाच्या सुविधा वाढवण्याची आणि विविध मोठ्या शहरांना जोडणाऱ्या विमानसेवा सुरू करण्याची आवश्यकता आहे. कचरा व्यवस्थापन, तरुणांना रोजगाराच्या संधी, जिल्हा रुग्णालयातील तातडीच्या सेवा, आणि सोयाबीन हमीभाव अशा मुद्यांवरून अमित देशमुख सध्या बॅकफुटवर गेल्याचं समजत आहे.

अशातच भाजपनं जातीय समीकरणांची जुळवाजुळव करताना लिंगायत मतांवर लक्ष केंद्रित केले आहे. लातुरमध्ये जातीय समीकरण बघायचं झाल्यास याठिकाणी मराठा मतदार २६ टक्के, लिंगायत समाज २५ टक्के, याशिवाय दलित आणि मुस्लिम मतांची संख्या अनुक्रमे २३ टक्के आणि २९ टक्के आहे. कॉंग्रेसचा मराठा आणि मुस्लिम मतदारांवर विश्वास तर भाजपने लिंगायत समाजाला आकर्षित करण्याची रणनिती आखलीय…

असं असलं तरी भाजपनं यंदा या मतदारसंघावर विशेष लक्ष घातलंय.. स्वत; नितीन गडकरी यांनी चाकूरकरांसाठी प्रचार सभा घेतलीय.. केंद्रीय मंत्री पियुष गोयलही मतदारसंघात फिरतांना दिसताहेत.. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चाकूरकरांसाठी प्रचार सभा घेणार आहेत. यासोबत महायुतीचे सर्वच नेते कॉंग्रेसला घेरण्यासाठी मतदारसंघात सक्रीय झालेहेत… त्यामुळे यंदा लातूर शहर मतदारसंघात चाकूरकर करिष्मा करणार का ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button