TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे
आठ तासात मानाच्या चार गणपतींचे विसर्जन
पुणे : दुपारी बारा वाजता सुरू झालेल्या पुण्याच्या दिमाखदार गणेश विसर्जन मिरवणुकीतील मानाच्या चार गणपतींच्या विसर्जनालाच आठ तास लागले. त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीत सहभागी होण्यास उत्सुक असलेल्या अनेक मंडळांना दीर्घ काळ वाट पाहावा लागत आहे.
मानाच्या पहिल्या, कसबा गणपतीची मिरवणूक सुरू झाल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मिरवणूक मार्गावर गर्दी केली होती. गर्दीचा हा उत्साह त्यानंतर येणाऱ्या मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी तिसरा गुरूजी तालीम आणि चौथा तुळशीबाग मंडळाचा गणपतीही मिरवणुकीत सहभागी झाले. पहिल्या गणपतीचे विसर्जन दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी झाले. तर दुसऱ्या मानाच्या गणपतींचे विसर्जन साडेचार वाजता झाले. मानाचा चौथा तुळशीबागेचा गणपती साडेसात वाजता विसर्जित झाला.




