Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीपिंपरी / चिंचवड

महाराष्ट्र–पंजाब आध्यात्मिक नाते अधिक दृढ : महापौर रवि लांडगे

घुमान (पंजाब) येथील ५ दिवसीय अभ्यास दौऱ्यातील संतपीठ सदस्यांचा महापालिकेत सन्मान

पिंपरी- चिंचवड : शिख धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिब मध्ये संत परंपरेतील संतांच्या वाणीसह संत नामदेव यांच्या अभंगांचा समावेश असणे ही महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील आध्यात्मिक व सांस्कृतिक नात्याची जिवंत साक्ष आहे. भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश देणारा हा सांस्कृतिक वारसा दोन्ही राज्यांना एका सूत्रात बांधणारा असून राष्ट्रीय एकात्मतेचे सुंदर उदाहरण आहे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिका संचलित जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ यांच्या वतीने पंजाबमधील घुमान येथे नुकत्याच पार पडलेल्या पाच दिवसीय अभ्यास दौऱ्यात सहभागी झालेल्या १८ सदस्यांचा दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

घुमान येथील संत नामदेव मंदिरात ऐतिहासिक हिंदी कीर्तन

अभ्यास दौऱ्यादरम्यान प्रतिनिधींनी घुमान इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, बाबा नामदेवजी गव्हर्नमेंट डिग्री कॉलेज आणि बाबा आया सिंग रिअरकी कॉलेज येथे भेटी दिल्या. तसेच घुमान येथील संत नामदेव महाराज मंदिर येथे संतपीठाचे संचालक हभप राजू महाराज ढोरे यांनी “तु अगाध वैकुंठनायका | तेरे चरणो मेरा माथा ||” या अभंगावर हिंदीत कीर्तन सेवा सादर केली. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार घुमान येथील मूळ मंदिरात प्रथमच हिंदीत कीर्तन सेवा पार पडली. यापूर्वी १९७० साली हभप ज्ञानेश्वर माऊली देहूकर-पंढरपूर फड यांनी मंदिरासमोर सप्ताह केला होता. त्यानंतर प्रथमच संतपीठाच्या माध्यमातून ही कीर्तनसेवा साकारली गेली, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली.

हेही वाचा –  आकुर्डीच्या डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या ‘बी. फार्मसी’ अभ्यासक्रमाला एनबीएचे पुनःमानांकन

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

महापौर लांडगे पुढे म्हणाले की, संतांच्या विचारांमधून समाजात ऐक्य, बंधुता आणि सद्भावना दृढ होत असून ही अमूल्य परंपरा जपणे व पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. संतपीठाच्या माध्यमातून आयोजित अशा अभ्यास दौऱ्यांमुळे सांस्कृतिक देवाणघेवाण वाढून महाराष्ट्र–पंजाब नाते अधिक भक्कम होईल. यावेळी महापालिकेचे उपायुक्त तथा संतपीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप खोत, शिक्षणाधिकारी तथा संतपीठाच्या सचिव संगीता बांगर, संतपीठाच्या संचालिका डॉ. स्वाती मुळे, संचालक हभप राजू महाराज ढोरे, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे यांच्यासह संतपीठाचे सदस्य, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“शिख धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिब मध्ये संत नामदेव महाराजांच्या अभंगांचा समावेश असणे ही महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील आध्यात्मिक ऐक्याची जिवंत साक्ष आहे. संतांच्या विचारांमधून भक्ती, समता आणि मानवतेचा जो संदेश दिला जातो, तो दोन्ही राज्यांना एका सूत्रात बांधतो. ही समृद्ध संतपरंपरा जपणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. घुमान येथील अभ्यास दौऱ्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण अधिक बळकट होऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दृढ होईल.”

– रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button