ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नाद घुमु दे, कमळ फुलु दे… प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांचा संकल्प!

लोकाभिमुख कामातून उभा राहिलेला विश्वास; विकासासाठी नागरिकांचा ठाम कौल

पिंपरी-चिंचवड | देशाचे कणखर नेतृत्व माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तसेच राज्याचे कणखर नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली राज्यातील नगरपरिषद निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. या यशानंतर आता येणाऱ्या पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० मध्ये राजकीय वातावरण तापू लागले असून, नागरिकांची पसंती स्पष्टपणे समोर येत आहे.

प्रभाग क्रमांक १० मधून आदर्श शिक्षिका अनुराधाताई गोरखे यांच्या नावाला नागरिकांचा प्रचंड पाठिंबा मिळत असून, मागील पंचवार्षिक कार्यकाळातील त्यांचे दमदार, लोकाभिमुख आणि सातत्यपूर्ण काम हेच त्यांच्या लोकप्रियतेचे प्रमुख कारण ठरत आहे. शिक्षण, मूलभूत सुविधा, नागरी प्रश्न आणि सामाजिक बांधिलकी या सर्व पातळ्यांवर त्यांनी केलेल्या कार्याची दखल आज प्रत्येक नागरिक घेताना दिसत आहे.

हेही वाचा     :          इंद्रायणीनगरमधून राष्ट्रवादीकडून तुषार सहाणे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार 

प्रभागात प्रत्यक्ष फिरून नागरिकांच्या अडचणी, भागनिहाय समस्या आणि आवश्यक सुविधांची माहिती घेण्याची त्यांची कार्यपद्धती नागरिकांना भावत असून, कामातून विश्वास निर्माण करणारी शैली हे त्यांचे मोठे भांडवल ठरत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता, सुरक्षा, तसेच विकासकामांचा पाठपुरावा या मुद्द्यांवर त्यांची भूमिका ठाम व परिणामकारक असल्याचे नागरिक सांगत आहेत. याच आपुलकीच्या संवादातून आणि जनतेच्या थेट संपर्कातून प्रभाग क्रमांक १० मधील वातावरण स्पष्टपणे सांगत आहे की

नागरिकांची एकच हाक, एकच मत आणि एकच संकल्प आहे…“नाद घुमु दे… कमळ फुलु दे!”

प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांचा हा विश्वास आणि उत्साह आगामी महानगरपालिका निवडणुकीत मोठा निर्णायक ठरेल, यात कसलीही शंका नाही. “अब की बार, १०० पार” हा नारा यावेळी पूर्णत्वास जाणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, प्रभाग क्रमांक १० मधून अनुराधाताई यावेळी किती लीड घेणार? आणि किती मतांच्या फरकाने निवडून येणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button