इंद्रायणीनगरमधून राष्ट्रवादीकडून तुषार सहाणे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

पिंपरी | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवकपदाचे अधिकृत उमेदवार तुषार भिवाजी सहाणे यांची उमेदवारी अर्ज. २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी नऊ वाजता दाखल करणार आहे.
सेक्टर-१, सेक्टर-२, सेक्टर-३ (गुरुविहार), सेक्टर-७, सेक्टर-४/६, मोशी प्राधिकरण, सेक्टर-१०, सेक्टर-१२, सेक्टर-१३, खंडेवस्ती व बालाजीनगर या परिसरातून प्रचार रॅली काढली जाणार आहे. यानिमित्ताने नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा : प्रभाग क्र. ११ मध्ये भाजपाचा प्रचार वेगात; हजारोंच्या उपस्थितीत शंखनाद!

याबाबत तुषार सहाणे म्हणाले, प्रभागातील जनतेचा पाठिंबा हीच आपली खरी ताकद असून, विकासाच्या या लढाईत उमेदवाराला आशीर्वाद देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत या कार्यक्रमामुळे परिसरात राजकीय हालचालींना वेग आला असून, नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.




