Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी-चिंचवड महापालिका व म्हाडा यांची संयुक्त बैठक

पिंपरी : पिंपरी-चिंचवड हद्दीतील म्हाडा गृह प्रकल्पातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्याकरिता पिंपरी-चिंचवड महापालिका व पुणे म्हाडा यांच्यामध्ये समन्वय बैठक झाली. या बैठकीत पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंग यांच्याशी म्हाडा सदनिका धारकांना भेडसावणार्या विविध पायाभूत समस्या सोडवण्यासाठी चर्चा झाली.
हेही वाचा – मतदार दोन हजारात विकले गेले, तुमच्यापेक्षा रांXX बऱ्या; आमदार संजय गायकवाड यांच्याकडून मतदारांना शिवीगाळ
याशिवाय अन्य शहर विकासाच्या कामांबाबत व नागरी हिताच्या कामांची सोडवणूक करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.यावेळी पुणे म्हाडाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री मा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल साकोरे, प्रा. दत्तात्रय भालेराव, तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संबंधित प्रमुख अधिकारी उपस्थित होते.





