मतदार दोन हजारात विकले गेले, तुमच्यापेक्षा रांXX बऱ्या; आमदार संजय गायकवाड यांच्याकडून मतदारांना शिवीगाळ

Sanjay Gaikwad | राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार व खातेवाटपही पार पडलं. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे आमदारांनी मतदारांनाच शिवागाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमदार संजय गायकवाड हे बुलढाण्यातील एका जाहीर सभेत बोलत होते.
आमदार संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?
तुम्ही मला साधं एक मत देऊ शकत नाही? फक्त दारू, मटण, पैसे? अरे दोन दोन हजारांत विकले गेले साले. दोन हजारात? पाच हजारात? यांच्यापेक्षा तर रांXXX बऱ्या, असं संजय गायकवाड म्हणाले.
अरे एकीकडे हा आमदार आपल्या लेकीबाळींचं कल्याण करायला निघाला, या मतदारसंघाचं कल्याण करायला निघाला आहे. माझा त्यात कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही. पण हे लोक संजय गायकवाडला पाडा वगैरे म्हणत होते. समजा मी पडलो असतो तर सगळे प्रकल्प होऊ शकले असते का? माझं आव्हान आहे, एक खडाही पडला नसता. तुम्ही तर परतफेड केलीत. तुमच्याबद्दल हा विषयच नाहीये, असंही संजय गायकवाड म्हणाले.





