Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवसेना शाखा प्रमुखाचा खून क्रिकेटवरील बेटिंगच्या पैशावरून झाल्याचे उघड

पिंपरी |महाईन्यूज|

शिवसेनेच्या शाखा प्रमुखाचा खून क्रिकेटवरील बेटिंगच्या पैशावरून झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली. विजय सर्जेराव सुर्वे (वय ४०, रा. चिंचवड) असे खून झालेल्या शिवसेनेच्या मोहननगर शाखाप्रमुखाचे नाव आहे.

या प्रकरणी हर्षद अशोककुमार राठोड (वय २९, रा. निगडी) याला पोलिसांनी ११ मार्चला; तर त्याचा साथीदार महंमद इकलाख महंमद इद्रिस (वय ३३, रा. दिल्ली) याला १५ मार्चला अटक केली. विजय सुर्वे यांचा मृतदेह मुळशी खुर्द येथे सापडल्यानंतर सुरुवातीला याबाबत पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा पिंपरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोन व पिंपरी पोलिसांचे वेगवेगळे पथक तयार करून तपास केला. दरम्यान, पोलिसांनी हर्षद राठोड याला अटक केली होती. त्याच्याकडे चौकशी करून पोलिसांनी त्याचा साथीदार इद्रिस याला निगडीमधून अटक केली. दोघांकडे तपास केला असता विजय सुर्वे हे क्रिकेटवर बेटिंग घ्यायचे. त्यातून आरोपी हर्षद हा त्यांच्याकडे जाऊ लागला. त्याने बेटिंगवर लावण्यासाठी १८ ते २० लाख रुपये सुर्वे यांच्याकडून घेतले.

घेतलेले पैसे सुर्वे यांनी परत मागितले असता, आरोपी हर्षद आणि इद्रिस यांनी मिळून सुर्वे यांना जमीन दाखवण्याच्या बहाण्याने काळभोरनगर चिंचवड येथून मोटारीमधून ताथवडे येथे मोकळ्या जागेत नेले. तिथे सुर्वे यांचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी सुर्वे यांचा मृतदेह पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुळशी खुर्द येथे टाकला. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button