Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘नरेंद्र मोदीजींच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढली’; माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

पिंपरी : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली भारताने केवळ प्रगतीच केली नाही, तर जागतिक पटलावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘संकल्प ते सिद्धी’ हे अभियान म्हणजे या ११ वर्षांच्या अतुलनीय वाटचालीचा गौरव आहे.” “आज भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे, पायाभूत सुविधांमध्ये क्रांती घडत आहे आणि सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल होत आहेत. शिक्षण, आरोग्य, सुरक्षा आणि डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सरकारने प्रत्येक स्तरावर काम केले आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ हे केवळ एक घोषवाक्य नसून, ते मोदी सरकारच्या कारभाराचे आणि भारताच्या विकासाचे मूलभूत तत्त्व आहे. पुढील काळातही देशाची ही विकासाची घोडदौड अशीच वेगाने सुरू राहील आणि भारत एका नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळावर प्रकाश टाकतांना ते बोलत होते.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रीय समितीने सुरू केलेल्या ‘संकल्प ते सिद्धी’ अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वात बुद्धीजीवी संमेलन’  शनिवारी, सायंकाळी हॉटेल कलासागर, कासारवाडी, येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.  यावेळी, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना संबोधित केले. भारताच्या विकासाची वाटचाल आणि पुढील दिशा यावर विचारमंथन करण्यासाठी आयोजित या संमेलनाला डॉक्टर, वकील, सीए, अभियंता अशा प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थित राहून आपली मते व्यक्त केली.

भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार तथा बुद्धिजीवी संमेलनाचे आयोजक महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुद्धिजीवी संमेलनाचे संयोजक ऍड. गोरखनाथ झोळ, सहसंयोजक सीए बबन डांगले, दीपक भंडारी, चैतन्य पाटील, अमेय देशपांडे व डॉ. प्रताप सोमवंशी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

हेही वाचा –  महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांती! सातबारा उतारा आता थेट व्हॉट्सॲपवर…

यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार उमाताई खापरे, माजी खासदार अमर साबळे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी महापौर राहुल जाधव, दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, महेश कुलकर्णी, सरचिटणीस संजय मंगोडेकर, विजय उर्फ शीतल शिंदे, अजय पाताडे, शैला मोळक, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, शहर प्रवक्ते राजू दुर्गे, माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, शैलेश मोरे, उत्तम केंदळे, सुभाष चिंचवडे, यशवंत भोसले, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, माधवी राजापुरे, निर्मला कुटे, सविता खुळे, वैशाली खाडेय, भारती विनोदे, मंडल अध्यक्ष मोहन राऊत, ऍड.हर्षद नढे, सनी बारणे, गणेश ढोरे, सोमनाथ तापकीर, ऍड. योगेश सोनवणे, अमोल डोळस, शिवराज लांडगे, अजित बुर्डे, रामदास कुटे, धरम वाघमारे, जयदीप खापरे, मंगेश धाडगे, अनिता वाळूंजकर, काळुराम बारणे, विजय फुगे, संजय पटनी, हनुमंत लांडगे, ऍड. सय्यद सिकंदर, माणिकराव अहिरराव, अजित कुलथे, रवी देशपांडे, जवाहर ढोरे, महादेव कवितके, संतोष तापकीर, कैलास कुटे, विशाल वाळुंजकर, सचिन तापकीर, चेतन बेंद्रे, सागर फुगे, कैलास सानप, गणेश ढाकणे, सचिन राऊत, हरीश मोरे, प्रकाश लोहार, राकेश नायर, संजय कणसे, कविता हिंगे, दीपाली धनोकार, तेजस्विनी दुर्गे, राजश्री जायभाय, आशा काळे, पल्लवी पाठक, गीता महेंद्रू, नंदू भोगले, पोपट हजारे, भूषण जोशी यांच्यासह सर्व आघाड्यांचे पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात देशाने विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीची प्रशंसा केली. देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात मोदी सरकारने बजावलेली भूमिका यावर मान्यवरांनी विचारमंथन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक संजय मंगोडेकर यांनी मांडले. सूत्रसंचालन मोरेश्वर शेडगे यांनी तर आभार राजेश पिल्ले यांनी मानले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button