TOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

11 व्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेचे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी चिंचवड | हॉकी इंडिया यांच्या मान्यतेने, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका, पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालय व हॉकी महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने आजपासून सुरू झालेल्या 11 व्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेचे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या स्पर्धेच्या चषकाचे अनावरण करुन स्पर्धा सुरु झाल्याची उद्घोषणा महापौर उषा ढोरे यांनी केली.मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी येथे झालेल्या या कार्यक्रमास भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले यांच्यासह उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, पक्षनेते नामदेव ढाके, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, माजी ऑलिम्पियन हॉकी खेळाडु रुपींदरपाल सिंग, क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे उपस्थित होते.

तसेच, महिला व बालकल्याण समिती सभापती सविता खुळे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, नगरसदस्या शारदा बाबर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, हॉकी इंडियाचे सहसचिव फिरोज अन्सारी, हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मनिष आनंद, सरचिटणीस मनोज भोरे, सहशहर अभियंता सतिश इंगळे, कार्यकारी अभियंता सुनिल वाघुंडे, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

स्पर्धेसाठी दाखल झालेल्या विविध राज्यातील खेळाडुंनी चमकदार कामगिरी करुन आपल्या संघासाठी यश मिळवून द्यावे, क्रीडा प्रेमींनी या स्पर्धेला प्रतिसाद देऊन खेळाडुंना प्रोत्साहीत करावे असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी यावेळी केले. स्पर्धेत एकुण 50 सामन्यांमध्ये एकुण 30 राज्यांच्या संघांमधील 750 खेळाडू सहभागी झाले असून 40 पंच, 8 सिलेक्टर, 10 पदाधिकारी व 90 स्वयंसेवक स्पर्धेचे कामकाज पाहत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button