ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आगामी काळात महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता – योगेश बहल

महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणीसाठी कार्यकर्त्यांना आवाहन

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नुतन कार्यकारिणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच जाहीर केली जाईल. त्या दृष्टीने सदस्य नोंदणी अभियान देखील सुरू करण्यात येणार आहे. पक्ष संघटनाच्या माध्यमातून आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने जोमाने काम करायचे आहे. आगामी काळात महानगरपालिकेत एक हाती सत्ता आणण्यासाठी पक्ष संघटनात्मक बांधणी करा असे आवाहन पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्यावतीने कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी शहराध्यक्ष योगेश बहल होते. आमदार आण्णा बनसोडे , निरिक्षक सुरेश पालवे, महिला निरिक्षक शितल हगवणे यांची प्रमुख उपस्थित होती.

बैठकीमध्ये पक्षाची नुतन कार्यकारिणी जाहिर करणे, सदस्य नोंदणी अभियान शुभारंभ, आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या दृष्टीने शहरात पुन्हा एकदा महानगरपालिकेत एक हाती सत्ता आणण्यासाठी पक्ष संघटनात्मक बांधणी करण्यासाठी सदर बैठकीत चर्चा करण्यात आली.

हेही वाचा –  राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्रस्थानी

यावेळी योगेश बहल म्हणाले की, आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये महिलांना ५०% आरक्षण आरक्षण आहे. त्यामुळे अधिकाधिक महिलांनी राजकारणामध्ये अधिक संख्येने सक्रीय होऊन आरक्षणाचा फायदा घ्यावा, यासाठी महिला यांचे संघटन करावे, महिला दिनानिमित्त महिला सक्षमिकरण तसेच पक्षाच्यावतीने पक्षाची भूमिका समाजावून सांगावी, सभासद नोंदणी करावी, विविध उपक्रम राबवावेत. महिला, युवक व युवती, विद्यार्थी व सर्व सेल यांनी आगामी भविष्य काळात अधिक अग्रक्रमाणे जोमाने काम करावे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार निवडणूकीस सामोरे जायचे आहे. लाडकी बहीण योजना तसेच शासनाच्या विविध योजना महायुती सरकारच्यावतीने राबविण्यात आलेल्या योजना राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने जन सामान्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविणे कामी महिला बचत गट, महिला संघ, युवक, युवती, विद्यार्थी इतर सेल यांच्या विविध कार्यक्रमातून त्या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न करावे, महिला दिनानिमित्त आपल्या प्रभागांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे व घरोघरी राष्ट्रवादी विचार व विस्तार हा उपक्रम राबवावा अशा सुचना यावेळी शहराध्यक्ष बहल यांच्याकडून पदाधिकारी यांना देण्यात आल्या.

शहर महिला अध्यक्ष कविता आल्हाट, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, शाम लांडे, संतोष बारणे, फजल शेख, मोरेश्वर भोंडवे, युवक अध्यक्ष शेखर काटे, विद्यार्थी अध्यक्ष चेतन दुधाळ, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, रोजगार व स्वयंरोजगार प्रदेशाध्यक्ष मेघा पवार, प्रदेश कार्याध्यक्ष ॲड.सचिन आवटे, मा.सभापती विजय लोखंडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष विनोद नढे, संघटक सतीश दरेकर, पिंपरी विधानसभा संघटक नारायण बहिरवाडे, भोसरी विधानसभा संघटक प्रकाश सोमवंशी, माजी नगरसेवक अतुल शितोळे, भाऊसाहेब भोईर, राजू बनसोडे, उपमहापौर मोहम्मद पानसरे, जगन्नाथ साबळे, उल्हास शेट्टी, प्रसाद शेट्टी, राजेंद्र जगताप, राजेंद्र साळुंखे, माजी नगरसेविका शमीम पठाण, निकिता कदम, उषा वाघेरे, उषा काळे, माई काटे, शांती सेन, लता ओव्हाळ, निलेश डोके, संजय आहेर, हरिभाऊ तिकोने, श्रीधर वाल्हेकर, तानाजी खाडे, बाबुराव शितोळे, रामआधार धारिया, माऊली सुर्यवंशी, गोरक्षनाथ पाषाणकर, बबन गाढवे, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, सविता धुमाळ, उज्वला ढोरे, चिंचवड विधानसभा अध्यक्षा संगीता कोकणे, महिला बचत गट महासंघ अध्यक्ष ज्योती गोफने, पुष्पा शेळके, वर्षा शेडगे, आशा शिंदे, गंगा धेंडे, संजय औसरमल, महेश झपके, श्रीकांत कदम, मनीषा गटकळ, रवींद्र ओव्हाळ, ॲड. संजय दातीर, विनोद वरखडे, डॅनियल दळवी, अकबर मुल्ला,निर्मला माने, अमोल भोईटे, शिरिश साठे, विकास साने, अश्विणी तापकीर, माधवी सोनार, दीपक साकोरे, माऊली मोरे, गोरोबा गुजर, संपत पाचुंदकर, राजेंद्रसिंग वालिया, अमोल भोईटे, सतीश क्षीरसागर, सुप्रिया सोळांकुरे, ॲड.राकेश गुरव, सुप्रिया काटे, कुशाग्र कदम,आशा मराठे, मेधा पळशीकर, रशीद सय्यद, अजहर खान, तुकाराम बजबळकर, शक्रुल्ला पठाण, मीरा कांबळे, उपस्थितीत होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button