Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

क्रांतीकारक व सैनिकांविषयी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता

शिक्षण विश्व: क्रांती दिन सप्ताह संत साई हायस्कूलमध्ये उत्साहात साजरा

पिंपरी | संत साई हायस्कूल, भोसरी येथे ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान क्रांती दिन सप्ताह मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या वर्षीचा सप्ताह कृतज्ञता वर्ष.म्हणून साजरा होत असल्याने, शाळेने परिचित व अपरिचित क्रांतीकारक आणि सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे विविध कार्यक्रम आयोजित केले.

कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. या प्रसंगी सेवानिवृत्त मिसाईल पायलट आदेश कुमार त्यागी, सेवानिवृत्त सैनिक अधिकारी भाऊ रामचंद्र मोहिते व सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल ओमप्रकाश सर यांच्या हस्ते मशाल पेटवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पाहुण्यांचे स्वागत आणि ओळख संजना सिंग यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीच्या स्वरूपा गव्हाणे आणि सोफी पोतदार या विद्यार्थिनींनी केले, तर आभार प्रदर्शन नीतिका कोठारी हिने केले.

हेही वाचा     :      पिंपरीतील वाघेरे कुटुंबीयांचा राष्ट्रवादीशी पुन्हा ‘संजोग’

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी क्रांतीकारक व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी कविता माहितीपूर्ण नाटिका तसेच ना झुकेगा देश अपना’ या देशभक्तिपर गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.

प्रमुख पाहुणे आदेश त्यागी यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना खेळणे, अभ्यास करणे आणि स्वप्न पाहणे या गोष्टींचे महत्व.समजावून सांगितले. तर भाऊ रामचंद्र मोहिते यांनी मुलींनी सैनिकी सेवेत मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे यासाठी प्रोत्साहन दिले.

या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सर्व परिचित व अपरिचित क्रांतीकारक आणि सैनिकांचे स्मरण करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी शपथ घेतली आणि ‘वंदे मातरम्’.घोषणेत कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक शिवलिंग ढवळेश्वर मुख्याध्यापिका सुनीता ढवळेश्वर उपमुख्याध्यापिका रूपाली खोल्लम शाळेचे विश्वस्त सदस्य पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button