Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

केदारनाथ धाम येथे गैर-हिंदूंवर बंदी घाला; भाजपा आमदाराची मागणी

Kedarnath Temple | केदारनाथ धाम येथे गैर-हिंदूंवर बंदी घालण्याची मागणी उत्तराखंडच्या भाजपा नेत्या आशा नौटियाल यांनी केली आहे. यामुळे एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. हिंदू नसणारे लोक या धार्मिक स्थळाच्या पावित्र्याला नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केदारनाथ येथील आमदार आशा नोटियाल यांनी केला आहे.

आशा नोटियाल म्हणाल्या, की काही गैर हिंदू घटक हे केदारनाथ धामच्या पावित्र्याला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. जर काही लोक असे काही करत असतील ज्यामुळे केदारनाथ धामची प्रतिमा घराब होईल तर त्यांच्या प्रवेशावर बंदी घातली पाहिजे. ते निश्चितपणे बाहेरून येणारे गैर-हिंदू आहेत जे बाहेरून येथे येतात आणि धामची बदनामी करण्यासाठी अशा गोष्टी करू लागतात.

हेही वाचा  : ‘माझे दोन्ही पुत्र कर्तृत्ववान हे माझं भाग्य’; नारायण राणे

या प्रकरणी मंत्री सौरभ बहुगुणा यांनी स्थानिक प्रशासन आणि रहिवाशांबरोबर बैठक घेतली. या बैठकीत काही सहभागींनी सुचवले की काही गैर-हिंदू व्यक्ती हे केदारनाथ मंदिराच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांची ओळख पटवून त्यांच्या मंदिराच्या परिसरातील प्रवेशावर बंदी घातली पाहिजे असेही नौटियाल म्हणाल्या.

अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर ३० एप्रिलपासून चार धाम यात्र सुरू होणार आहे , या दिवशी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडले जातील. केदारनाथ धामचे दरवाजे हे २ मे रोजी तर बद्रिनाथ धामचे ४ मे रोजी उघडतील.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button