Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

बारामतीत पुन्हा विमान अपघात; प्रशिक्षणार्थी विमान कोसळल्याने खळबळ

बारामती | रेडबर्ड एव्हिएशन कंपनीच्या एका प्रशिक्षण विमानाला बुधवारी सकाळी तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करावे लागले. बारामती विमानतळाजवळील गोजुबावी गावाजवळ ही घटना घडली. सुदैवाने, या घटनेत प्रशिक्षणार्थी वैमानिक सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ८:४० च्या सुमारास रेडबर्ड कंपनीचे विमान प्रशिक्षण सत्रासाठी हवेत झेपावले होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (SP) संदीप सिंह गिल यांनी सांगितले की, सकाळी साधारण ८:५० वाजता हे विमान गोजुबावी गावाजवळ कोसळले.

हेही वाचा

सोने-चांदी खरेदी महागणार! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आयात शुल्कात १५ टक्क्यांपर्यंत वाढ

विजेच्या खांबाला धडक अन् सुरक्षित लँडिंग

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमान कमी उंचीवरून उडत असताना तांत्रिक बिघाडामुळे नियंत्रणाबाहेर गेले. जमिनीवर कोसळण्यापूर्वी विमानाचा एक भाग विजेच्या खांबाला धडकला. मात्र, अशा कठीण परिस्थितीतही प्रशिक्षणार्थी वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान शेजारील एका उसाच्या शेतात उतरवले. वैमानिकाच्या या धाडसामुळे मोठा अपघात टळला असून जमिनीवरील कोणत्याही व्यक्तीला किंवा मालमत्तेला इजा झालेली नाही.

वैमानिक सुरक्षित, तपास सुरू

विमानामध्ये फक्त एकच प्रशिक्षणार्थी वैमानिक होता. त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही, मात्र या घटनेमुळे तो काहीसा मानसिक धक्क्याखाली असल्याची माहिती समोर आली आहे. विमान शेतात उतरताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विमानातील तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण काय होते, याचा तपास आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button