Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हिंदुभूषण क्रीडा महोत्सव 2025 : दिघी-बोपखेल चषकला उत्स्फूर्त प्रतिसाद!

भाजपाचे उदय गायकवाड यांच्या पुढाकाराने लक्षवेधी स्पर्धा

पिंपरी-चिंचवड | आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदू भूषण क्रीडा महोत्सव 2025 अंतर्गत आयोजित दिघी–बोपखेल (महिला) चषक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस उदय दत्तात्रय गायकवाड यांनी या लक्षवेधी स्पर्धा भरवल्या आहेत.

विविध सोसायटींमधील महिला खेळाडूंच्या संघांनी दाखवलेली उत्साहपूर्ण उपस्थिती आणि प्रखर स्पर्धात्मकता यामुळे AK टर्फ, दिघी हे मैदान आज क्रीडामहोत्सवाने उजळून निघाले. कुटुंबासह स्थानिक नागरिकांच्या मोठ्या गर्दीने प्रेक्षागृह गजबजलेले दिसले.

महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धा आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना उदय गायकवाड म्हणाले की, “दिघी-बोपखेल परिसरात असलेल्या खेळाडूंना प्रोत्साहन आणि संधी देणे हेच या उपक्रमाचे मुख्य ध्येय आहे. महिलांनी क्रीडा क्षेत्रात सक्रियपणे पुढे येणे ही समाजासाठी अभिमानाची बाब असून त्यांना सर्वोत्तम मंच देणे ही आमची जबाबदारी आहे.”

हेही वाचा     :          लाडकी बहीण व शेतकऱ्यांच्या योजना कधीही बंद होणार नाहीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पिंपरी–चिंचवड शहर सरचिटणीस पदी निवड झाल्यानंतर उदय गायकवाड यांची कामाची गती आणि युवांसाठीची ऊर्जा अधिकच वाढली असून त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय या भव्य आयोजनातून येत असल्याचे नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे व्यक्त होत आहे.

या उपक्रमात निमंत्रक म्हणून सौ. मंगल संतोष घुले, सौ. उषा दिलीप पाटील, सौ. आश्विनी रविंद्र गायकवाड, सौ. धनश्री उदय गायकवाड आणि उदयभाऊ गायकवाड युवा मंच यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दिघी–बोपखेल परिसरासाठी क्रीडा आणि महिला सक्षमीकरणाचा उत्सव ठरत असलेला हा महोत्सव उदय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आणखी मोठा होत असून, पुढील दिवसांतही मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे.

दिघी–बोपखेलमधील हिंदुभूषण क्रीडा महोत्सव व दिघी-बोपखेल चषक हा आमच्या भागातील लक्षवेधी क्रीडा महोत्सव आहे. स्थानिक खेळाडुंना सामर्थ्य देण्यासाठी, त्यांची प्रतिभा ओळखून तिला योग्य व्यासपीठ देण्यासाठी हा उपक्रम आम्ही आयोजित केला आहे. खेळामुळे आत्मविश्वास वाढतो, शिस्त तयार होते आणि समाज अधिक सक्षम होतो आणि हे परिवर्तन आपल्या परिसरातील खेळाडुंच्मया हातून होताना पाहणे हीच आमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे.

– उदय गायकवाड, सरचिटणीस, भाजपा, युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवड.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button