Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Ground Report: माजी आमदार विलास लांडे यांना आता तरी विधान परिषदेची संधी मिळणार का?

विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर

 माजी आमदारांकडून ‘ त्या ‘ शब्दाची पक्षश्रेष्ठींना आठवण

पिंपरी- चिंचवड । विशेष प्रतिनिधी :  विधान परिषदेच्या 5 रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विधान परिषदेच्या माध्यमातून आमदारकी मिळवण्यासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत. नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण देखील करून दिली जात आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द दिला होता. आता आमदारकीची माळ गळ्यात पडावी यासाठी विलास लांडे यांच्याकडून ‘त्या’ शब्दाची आठवण करून दिली जाईल का? किंवा लांडे यांच्या गळ्यात विधान परिषदेच्या आमदारकीची माळ पडणार का? याबाबत उत्सुकता आहे.

चार महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुका नंतर राज्याच्या राजकीय पटलाचे चित्र 90 डिग्री मध्ये पालटले. त्यातच आता विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर आपली वर्णी लागावी यासाठी स्थानिक पातळीवरील आजी माजी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवड मधून माजी आमदार विलास लांडे यांच्यासह माजी महापौर योगेश बहल विधान परिषदेच्या आमदारकीसाठी इच्छुक आहेत. माजी आमदार विलास लांडे यांनी तर मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली आहे.

राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे मात्र, दुसरीकडं विधान परिषदेच्या 5 जागा रिक्त झालेल्या आहेत. त्या जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. भाजपा तीन, शिवसेना (शिंदे गट) एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एक जागा रिक्त झाली आहे. या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे.

हेही वाचा –  पीएमपी प्रवाशांचा लवकरच आरामदायी प्रवास; पीएमपीमध्ये कोणते नवीन बदल होणार?

विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षीय धोरणानुसार शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला. यावेळी राज्यपाल नियुक्त 12 जागांवर वर्णी लागेल असा माजी आमदार विलास लांडे यांचा होरा होता.मात्र त्यावेळी संधी हुकली. फंदीफितुरी होऊ नये यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी आगामी काळात विचार केला जाईल असा शब्द विलास लांडे यांना दिला होता. आता विलास लांडे यांनी या शब्दाची आठवण करून दिली आहे असे सूत्रांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

राष्ट्रवादीमध्ये खदखद..

भाजपबरोबर गेलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सध्या अंतर्गत खदखद वाढले आहे. भाजपा सारखा पक्ष अमित गोरखे यांना आणि त्यापूर्वी उमा खापरे यांनी विधान परिषद देतो. अमर साबळे यांना थेट राज्यसभा मिळते. सचिन पटवर्धन यांना लोकलेखा समिती अध्यक्षपद, तर सदाशिव खाडे यांना पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अध्यक्ष केले जाते. इथे राष्ट्रवादीत मात्र, सत्तेत असतानाही काही मिळत नाही, अशी खंत शहरातील ज्येष्ठ नेत्यांच्या समर्थकांमधून बोलून दाखवली जात आहे.

निवडणुकीचा ‘असा’ आहे कार्यक्रम

विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 10 मार्च ते 17 मार्च या कालावधीत उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर उमेदरावांच्या अर्जाची 18 मार्चला छाननी होणार आहे. या निवडणुकीत अर्ज केल्यानंतर अर्ज मागे घेण्याचा निर्णय झाला तर तसा अर्ज मागेदेखील घेता येऊ शकतो. अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची तारीख ही 20 मार्च असणार आहे. पण त्यानंतर अर्ज मागे घेता येणार नाही. मग थेट मतादानाच्या प्रक्रियेत त्या उमेदवाराचे नाव सहभागी झालेले बघायला मिळेल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button