डी. वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हरसिटीच्या ‘आकृती’ वार्षिक कला प्रदर्शनाचा उद्या भव्य शुभारंभ;
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा उत्सव डी. वाय. पाटील आकुर्डी येथे रंगणार

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी: कला, कल्पनाशक्ती आणि अभिव्यक्ती यांचा संगम असलेले ‘आकृती – वार्षिक शैक्षणिक कला प्रदर्शन २०२५–२०२६’ उद्या, शुक्रवार १० एप्रिल २०२६ रोजी आकुर्डी येथे भव्य स्वरूपात संपन्न होणार आहे. हे कला प्रदर्शन डी. वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हरसिटी अंतर्गत स्कूल ऑफ अप्लाईड आर्टस् अँड क्राफ्ट्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.
उद्या सकाळी १० वाजता या कला प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, चित्रपट आणि जाहिरात क्षेत्रातील नामवंत दिग्दर्शक महेश घरत (संचालक , हंगरी फिल्म्स व ओगिल्वी साऊथचे माजी चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. तर प्रख्यात कलाकार पराग बोरसे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनाची संकल्पना “Where Creativity Meets Expression – A Celebration of Art & Imagination” अशी असून, यात स्कूल ऑफ अप्लाईड आर्टस् अँड क्राफ्ट्स मधील विद्यार्थ्यांनी वर्षभरात साकारलेल्या कलाकृती मांडण्यात येणार आहेत. चित्रकला, शिल्पकला, कमर्शियल आर्ट, डिझाइन, क्राफ्ट आणि विविध आधुनिक कलामाध्यमांचा समावेश या प्रदर्शनात असणार आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा, सामाजिक भानाचा आणि कलात्मक दृष्टिकोनाचा आविष्कार या कलाकृतींतून पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा : त्यागमूर्ती रमाई आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन जयंती महोत्सवातच होणार..!
उद्घाटनानंतर सकाळी ११ वाजता उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे. या समारंभास विद्यापीठाचे डॉ. संजय डी. पाटील – कुलपती, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी (DYPIU), तेजस एस. पाटील – विश्वस्त, प्रा. मनीष भल्ला – कुलगुरू, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी (DYPIU), रिअर अॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त) – कॅम्पस संचालक, डी. वाय. पाटील एज्युकेशन कॉम्प्लेक्स (DYPEC), डॉ. (प्रा.) बीरन मोईद्दीन बी. एम. – कुलसचिव, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी (DYPIU), श्री. बिपिन शर्मा – मुख्य वित्त अधिकारी (CFO), डी. वाय. पाटील एज्युकेशन कॉम्प्लेक्स (DYPEC), डॉ. अनुपमा पाटील – अभियांत्रिकी विद्याशाखेच्या अधिष्ठाता, (DYPIU), डॉ. माधवी देशपांडे – अभियांत्रिकीेतर विद्याशाखेच्या अधिष्ठाता (DYPYU), श्री. जयप्रकाश कळवले संचालक, स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट्स अँड क्राफ्ट्स (SoAAC) उपस्थित राहणार असून, गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या कलात्मक योगदानाबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. नितीन तावरे, श्री. शरद वाडकर, श्री. राजेश पुजारी हे संपर्क प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.


हे कला प्रदर्शन १० ते १८ एप्रिल २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कला रसिकांसाठी खुले असणार आहे. प्रदर्शनाचे आयोजन डी. वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हरसिटी आकुर्डी येथील जे बिल्डिंग, पहिला मजला येथे करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या सर्जनशीलतेला दिशा देणे आणि कला शिक्षणाला प्रोत्साहन देणे, हा या प्रदर्शनामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. उद्याच्या या भव्य कला सोहळ्यामुळे आकुर्डी परिसरात कला आणि सर्जनशीलतेचे वातावरण निर्माण होणार असून, कला प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





