ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीत श्रीराम नवमी निमित्त दिमाखदार बाईक रॅली; “जय श्रीराम”च्या घोषणांनी दुमदुमला परिसर!

नगरसेविका कविता भोंगाळे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिस्तबद्ध आयोजन

पिंपरी-चिंचवड | श्रीराम नवमीच्या पावन आणि मंगलमय निमित्ताने भोसरी परिसरात सलग पाचव्या वर्षी भव्य, दिमाखदार आणि उत्साहपूर्ण बाईक रॅली मोठ्या जल्लोषात पार पडली. मा. आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका कविता भोंगाळे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे उत्कृष्ट नियोजन व यशस्वी आयोजन करण्यात आले.

रॅलीची सुरुवात राम मंदिर, चक्रपाणी वसाहत रोड, भोसरी येथून करण्यात आली. यावेळी शेकडो रामभक्त युवकांनी भगवे झेंडे हातात घेत “जय श्रीराम”च्या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले होते.

रॅलीमध्ये सहभागी युवकांनी शिस्तबद्ध व सुरक्षित पद्धतीने मार्गक्रमण करत सामाजिक जबाबदारीचे भान राखले. त्यांच्या या अनुशासित सहभागामुळे समाजासमोर एक आदर्श निर्माण झाला. या उपक्रमामुळे भोसरी परिसरात सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा      :            To The Point : राष्ट्रवादीच्या संदीप वाघेरेंची भूमिका म्हणजे ‘‘विचारांची तूट अन्‌ भाषणाला उत’’

या प्रसंगी मंडलाध्यक्ष रविंद्रजी नांदुरकर, महिला मोर्चा सरचिटणीस रोहिणीताई मांढरे, महिला मंडलाध्यक्ष योगिताताई जाधव, प्रभाग अध्यक्ष स्वातीताई शिर्के, सरचिटणीस मनीषाताई गंगणे, उषाताई घुगे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

उपस्थित मान्यवरांनी श्रीरामांच्या आदर्शांचे समाजात पालन करण्याचे आवाहन केले. तसेच युवकांच्या उत्साहाचे आणि शिस्तबद्ध सहभागाचे मनापासून कौतुक करण्यात आले. या भव्य रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व आयोजक, स्वयंसेवक आणि सहभागी युवकांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

श्रीरामांच्या आदर्शांवर चालत समाजात एकता, शिस्त आणि सकारात्मकता निर्माण करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. भोसरीतील युवकांचा उत्साह आणि जबाबदारीची जाणीव पाहून समाधान वाटते. अशा उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहू.

– कविता भोंगाळे-पाटील, नगरसेविका, भाजपा.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button