ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गणेशोत्सवात चोख बंदोबस्त ठेवल्याबद्दल महिला पोलिसांचा सत्कार

विधायक उपक्रम: कर्तव्यदक्ष पोलिसांच्या पुढे आदर्श

पिंपरी चिंचवड : नुकताच पार पडलेला अकरा दिवसांचा गणेशोत्सव कुठलाही अनुचित प्रकार न होता शांततेत पार पडला. या उत्सवात लाखो भाविक सहभागी झाले होते, मात्र पोलिस प्रशासनाने चोख नियोजन करून गर्दीवर अचूक नियंत्रण ठेवले. या यशामध्ये महिला पोलिसांचे योगदान विशेष ठरले.

हेही वाचा  : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू

गणपती आगमनापासून ते विसर्जनापर्यंत प्रत्येक मिरवणुकीत महिला पोलिसांनी अत्यंत दक्षतेने आपली जबाबदारी पार पाडली. स्वतःच्या कुटुंबातील सण बाजूला ठेवत त्यांनी समाजासाठी अहोरात्र कार्य केले. अनेक महिला पोलिस पहाटे दोन वाजेपर्यंत ड्युटीवर होत्या. या समर्पणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या कामगिरीची दखल घेत निर्मला जगताप, नीरजा देशपांडे, अनिता धाक्रस आणि माधव पाटील यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून महिला पोलिसांचा सत्कार केला. या वेळी सत्कारमूर्तींना शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाला वरिष्ठ पोलिस अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button