ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

“गॅलेक्सी ऑफ पीसीसीओइ स्टार” चे शनिवारी प्रकाशन

पीसीसीओइच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा आयोजित

पिंपरी | पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा सांगणारे “गॅलेक्सी ऑफ पीसीसीओइ स्टार” या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी, (दि.२१ मार्च) सकाळी १० वाजता, आयोजित करण्यात आलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यात होणार आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीइटी) चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी पीसीइटीचे उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ गिरीश देसाई पीसीसीओइ चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती पीसीइटीचे सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ.शितलकुमार रवंदळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

पीसीसीओइ माजी विद्यार्थी संघटना आणि पीसीइटी सेंट्रल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग यांच्या वतीने आयोजित केलेल्या या माजी विद्यार्थी मेळाव्यास देश, परदेशात विविध क्षेत्रात नोकरी, उद्योग, व्यवसाय करणारे माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच पीसीसीओइचे मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲपल, अमेझॉन आदी सारख्या उच्च उत्पादन कंपन्यांमध्ये उच्च पगारासह नोकरी करणारे, जगातील प्रसिद्ध विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी, पीएचडी व ज्यांनी स्वतःची कंपनी, संस्था यशस्वीरित्या स्थापन केली आहे असे उद्योजक, ज्यांनी विविध कंपन्यांमध्ये संशोधन आणि विकास क्षेत्रात काम केले आहे असे माजी विद्यार्थी तसेच केंद्र, राज्य सरकारी आस्थापनांमध्ये काम करणारे, त्याचबरोबर शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण, मॉडेलिंग, अभिनय, छायाचित्रण अशा विविध क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा सांगणारे “गॅलेक्सी ऑफ पीसीसीओइ स्टार” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या आयोजनात प्रा. हिना शर्मा, प्रा. विजय टोपे, प्रा. ऋषिकेश पांडे, प्रा. पायल काळे, प्रा. अतुल पवार, प्रा. संदीप पिल्लेवार प्रा. निखिल सुरवडे, प्रा. शैलेश गलांडे, प्रा. तन्मय खांडेकर, प्रा. अजय पाटील, प्रा. स्फूर्ती देशमुख, प्रा. डेंझेटा लोबो, प्रा. गणेश देशमुख तसेच मंगेश काळभोर आणि विद्यार्थी प्रतिनिधी निशांत कुलकर्णी, प्रसाद कोलते यांनी सहभाग घेतला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button