Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दहावीचा भूगोलाचा पेपर फुटला!

सांगोल्यात स्ट्राँग रूम फोडली; बोर्डाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

पंढरपूर : दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची अत्यंत सुरक्षित मानली जाणारी ‘स्ट्राँग रूम’ फोडून भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरून नेल्याची धक्कादायक घटना सांगोला विद्यामंदिर प्रशालेत उघडकीस आली आहे. या चोरीमुळे केवळ सांगोलाच नव्हे तर संपूर्ण राज्य शिक्षण मंडळ हादरले असून गुरूवारी होणाऱ्या भूगोलाच्या पेपरच्या गोपनीयतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असून, आता बोर्ड काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या प्रश्नपत्रिका सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी या रूमचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील भूगोलाच्या प्रश्नपत्रिकांचे 50 प्रश्नपत्रिका लंपास करण्यात आल्या आहेत. शनिवारी सकाळी जेव्हा केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली, तेव्हा एकच धावपळ उडाली. स्ट्राँग रूमसारख्या ठिकाणी ही चोरी झाल्याने शिक्षण मंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत.
The 10th Grade Geography Paper Has Leaked!
The 10th Grade Geography Paper Has Leaked!

ड्युटीवर असलेला कर्मचारी त्यावेळी नेमका कुठे होता? 

या चोरीने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे, ज्या स्ट्राँग रूमसमोर चोवीस तास कडक बंदोबस्त असणे अपेक्षित होते, तिथे चोरी झालीच कशी? असा सवाल उपस्थित होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे घटनेच्या वेळी स्ट्राँग रूमसमोरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आले आहे. चोरट्यांनी नियोजनबद्धरीत्या हे कृत्य केल्याचा संशय आहे. तसेच, ड्युटीवर असलेला कर्मचारी त्यावेळी नेमका कुठे होता, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

नेमकं काय झालं?

सकाळी शिक्षण विभाग आणि कस्तोडियन हे कालचे उरलेले पेपर बोर्डाकडे पोस्टात टाकण्यासाठी आले असता स्ट्रॉंग रूमचे कुलूप तोडल्याचे दिसून आले. सांगोला शहरातील सांगोला विद्यामंदिर येथे बोर्ड परीक्षेचे सर्व पेपर ठेवण्याचे स्ट्रॉंग रूम असून या स्ट्राँग रूम मधून ही चोरी झाली आहे. आज सकाळी साडेआठ वाजता या स्ट्रॉंग रूम जवळ अधिकारी पोचल्यावर कुलूप कापल्याचे दिसून आले.

बोर्डाच्या निर्णयाकडे लक्ष

प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, प्रश्नपत्रिका चोरीला गेल्यामुळे हा पेपर रद्द होणार की नवीन प्रश्नपत्रिका संच पुरवले जाणार, याबाबत शिक्षण मंडळाने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

उद्या पेपर असतानाच अशा प्रकारची घटना घडल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण आहे. परीक्षेच्या गोपनीयतेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने शिक्षण विभागाच्या कारभारावरही टीका होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button