Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रहाटणीत पावसामुळे उदभवलेल्या समस्यांची माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्याकडून पाहणी

प्रभागातील सर्व समस्या तातडीने मार्गी लावण्याचे प्रशासनाला दिल्या सूचना

आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब त्रिभुवन यांनी घेतला प्रभागाचा आढावा

पिंपरी | शहरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रहाटणी प्रभागात निर्माण झालेल्या अडचणी आणि समस्यांची माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी पाहणी केली. आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिभुवन यांनी प्रभागाचा आढावा घेत प्रभागातील सर्व अडचणी आणि समस्या तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

बाबासाहेब त्रिभुवन यांनी दोन दिवसांपासून संपूर्ण रहाटणी प्रभागात जाऊन पावसामुळे उदभवलेल्या समस्यांची पाहणी केली. यामध्ये प्रभागातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा करणे, लोकनेते गोपीनाथ मुंडे फलक चौक याठिकाणी उखडलेले ब्लॉक दुरुस्त करणे, तुंबलेले ड्रेनेज लाईन दुरुस्त करणे, जागोजागी साचलेला कचरा साफ करणे, नादुरुस्त स्ट्रॉम वॉटर लाईन दुरुस्त करणे, धर्मवीर संभाजी महाराज उद्यान येथील साचलेल्या पाण्याचा निचरा करणे, नागरी वस्त्यांमध्ये शुद्ध पाणीपुरवठा करणे, रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवने, तसेच प्रभागातील नैसर्गिक नाल्यांची सफाई करणे तसेच पवना नदीपर्यंत जाणाऱ्या नाल्यावरील कोसळलेल्या भिंतीची पाहणी करून सदर कोसळलेली भिंत काढून नाल्याचा मार्ग मोकळा करण्याच्या तसेच लवकरात लवकर नवीन भिंत बांधण्याच्या सूचना त्रिभुवन यांनी दिल्या.

हेही वाचा   :  आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

यावेळी त्यांच्यासमवेत स्थापत्य विभागाचे उपअभियंता श्री. बोरसे, कनिष्ठ अभियंता श्री. पवार, ड्रेनेज विभागाचे कनिष्ठ अभियंता धनाजी नखाते, तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी श्री. दरोडे, सामाजिक कार्यकर्ते नरेश खुळे, आशुतोष नखाते यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.

या पाहणी दौऱ्यात बाबासाहेब त्रिभुवन यांनी छत्रपती चौक ते तापकीर मळा मार्गावरील विविध कॉलन्या आणि सोसायट्या, लिंक रोड, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे फलक चौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान, प्रभागातील सर्व मुख्य व अंतर्गत रस्ते, पवनानगर, पवना नदी काठ या भागांची पाहणी केली. व त्या त्या ठिकाणच्या समस्यांसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करून या समस्या तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button