PM Awas Yojana : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘पीएम आवास’चा विस्तार; ९ नवीन ठिकाणी उभारली जाणार ६,५०० घरे!
PMAY: शहरातील बेघर आणि गरजू कुटुंबांसाठी दिलासादायक बातमी

पिंपरी-चिंचवड | शहरातील बेघर आणि गरजू कुटुंबांसाठी दिलासादायक बातमी आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ‘प्रधानमंत्री आवास योजने’चा (PM Awas Yojana) विस्तार करण्यात येणार असून, आणखी नऊ विविध ठिकाणी ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रकल्पांतर्गत एकूण साडेसहा हजार (६,५००) सदनिकांचे बांधकाम केले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे शहरातील तब्बल ६,५०० कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या आणि पक्क्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. (PM Awas Yojana) वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेत मोशीतील बोर्हाडेवाडी, चर्होली, पिंपरीतील उद्यमनगर, आकुर्डीतील मोहननगर येथे गृहप्रकल्प उभारला आहे. (PM Awas Yojana) तेथे एकूण 3 हजार 668 सदनिका आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील (ईडब्ल्यूएस) कुटुंबांना देण्यात आल्या आहेत. तर, डुडुळगाव येथील 1 हजार 190 सदनिकेचा गृहप्रकल्पांच्या इमारत बांधकाम सुरू आहे. न्यायालयात वाद गेल्याने जागा ताब्यात न आल्याने रावेत येथील 934 सदनिकांचा गृहप्रकल्प रद्द करण्यात आला आहे. तेथील लाभार्थ्यांना किवळे येथे सदनिका देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
रावेत येथील रद्द झालेला गृहप्रकल्प पंतप्रधान आवास योजनेच्या टप्पा दोनमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच, मामुर्डी, पुनावळे, वाकड, दिघी, वडमुखवाडी, ताथवडे, रावेत आणि चोविसावाडी असे एकूण नऊ ठिकाणी महापालिकेच्या वतीने (PM Awas Yojana) दुसर्या टप्प्यात ही योजना राबविण्यात येत आहे. महापालिकेने सुधारित विकास योजना आराखड्यात (डीपी प्लान) या आठ ठिकाणच्या जागा आरक्षित केल्या आहेत. त्यापैकी मामुर्डी, पुनावळे, वाकड, दिघी, वडमुखवाडी व रावेत या सहा ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सदनिका असणार आहेत. तर, उर्वरित रावेत, ताथवडे, चोविसावाडी या ती ठिकाणी एचडीएच गटासाठी (बेघरांसाठी घरे) गृहप्रकल्प आहे. रावेत येथे जुना तसेच, नवा असे दोन गृहप्रकल्प होणार आहेत.
या सदनिकांच्या प्रत्यक्ष ताब्यासाठी लाभार्थ्यांना किमान ३ ते ५ वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (PM Awas Yojana) दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ‘म्हाडा’साठी (MHADA) काही मोक्याच्या जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. या आरक्षित भूखंडांवर भविष्यात आणखी नवनवीन गृहप्रकल्प उभे राहतील, ज्यामुळे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध होतील, असा विश्वास महापालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा : ‘धुरंधर 2’ची धडाकेबाज सुरुवात; दोन दिवसांत 200 कोटींचा टप्पा ओलांडला
ईडब्ल्यूएसाठी उत्पन्न मर्यादा सहा लाख रुपये
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस होय. पंतप्रधान आवास योजनेत दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील ईडब्ल्यूएस वर्गासाठी पूर्वी 3 लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा होती. ती आता वाढवून 6 लाख रुपये करण्यात आली आहे. (PM Awas Yojana) आता सहा लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेत सदनिका खरेदी करता येईल; तसेच, पूर्वी 30 चौरस मीटर (323 चौरस फूट) चटई क्षेत्रफळाच्या (कार्पेट एरिया) सदनिका होत्या. आता त्या 45 चौरस मीटर (484 चौरस फूट) चटई क्षेत्रफळाच्या सदनिका असणार आहेत. शहरातील झोपडपट्टीतील पात्र झोपडीधारकांनाही या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.
“प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात शहरातील जास्तीत जास्त कुटुंबांना लाभ मिळवून देण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. (PM Awas Yojana) नवीन निकषांनुसार वाढलेली उत्पन्न मर्यादा, घरांचे वाढीव कार्पेट क्षेत्रफळ आणि झोपडपट्टीवासीयांचा विशेष समावेश यामुळे हजारो नागरिकांना या योजनेचा फायदा होईल.
नवीन निकषांनुसार होणार वाटप
दुसऱ्या टप्प्यातील गृहप्रकल्पांचे काम पूर्ण झाल्यानंतर, सुधारित नियमांनुसार पात्र लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप केले जाणार आहे. (PM Awas Yojana) पूर्वीच्या तुलनेत आता लाभार्थ्यांना अधिक प्रशस्त घरे मिळणार असून, उत्पन्न मर्यादेत शिथिलता आल्याने मध्यमवर्गीयांनाही या योजनेत सामावून घेणे शक्य होणार आहे. आगामी काळात शहरातील बेघरांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे गृहप्रकल्प मैलाचा दगड ठरतील, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
गृहप्रकल्प उभारण्याची कार्यवाही सुरू
शहरातील या नऊ ठिकाणच्या जागेवर पंतप्रधान आवास योजनेत गृहप्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी त्या जागा ताब्यात घेऊन भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत नगर रचना विभागास सूचित करण्यात आले आहे. (PM Awas Yojana) जागा ताब्यात आल्यानंतर त्या केंद्र व राज्य शासनाची मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. त्यानंतर गृहप्रकल्पासाठी इमारत उभारणीचे काम सुरू केले जाईल, असे महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.
या ठिकाणी होणार दुसर्या टप्प्यात पंतप्रधान आवास योजना
ठिकाण-प्रयोजन-क्षेत्र (हेक्टरमध्ये)
- मामुर्डी-ईडब्ल्यूएस-1.44
- पुनावळे-ईडब्ल्यूएस-2.00
- वाकड-ईडब्ल्यूएस-2.00
- दिघी-ईडब्ल्यूएस-1.14
- वडमुखवाडी-ईडब्ल्यूएस-2.00
- रावेत-ईडब्ल्यूएस-2.00
- रावेत-एचडीएच-2.00
- ताथवडे-एचडीएच-4.10
- चोविसावाडी-एचडीएच-3.59





