उत्साह, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम
जय महाराष्ट्र तरुण मित्र मंडळ, आळंदी रोड
पिंपरी चिंचवड : आळंदी रोडवरील जय महाराष्ट्र तरुण मित्र मंडळ हे गणेशोत्सवात आपल्या उत्साही सहभागामुळे आणि सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेमुळे विशेष लक्ष वेधून घेत आहे. मंडळातील युवा कार्यकर्त्यांनी संयोजन, शिस्त आणि विविध उपक्रमांतून गणेशोत्सव अधिक समृद्ध केला आहे.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
मंडळाने पर्यावरणपूरक सजावट आणि मूर्तीच्या माध्यमातून पर्यावरणसंवर्धनाचा संदेश दिला. या सर्व उपक्रमांत मंडळाचे अभिषेक जाधव, शुभम बढे आणि राहुल बर्डे यांनी विशेष पुढाकार घेतला.या तरुण कार्यकर्त्यांच्या संघटन क्षमतेमुळे मंडळाचा उत्सव शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी झाला. मंडळाच्या कार्यक्रमांना परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
“गणपती बाप्पा हे एकत्रित येण्याचे निमित्त आहे, आणि या माध्यमातून समाजासाठी काहीतरी चांगले करणे हेच आमचे ध्येय आहे,” असे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.जय महाराष्ट्र तरुण मित्र मंडळाचा हा सहभाग इतर मंडळांसाठीही आदर्शवत ठरत आहे.





