Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सामाजिक सलोख्याचा संदेश देत ईदनिमित्त नमाज पठण

पिंपरी चिंचवड शहरात बकरी ईद उत्साहात साजरी.

पिंपरी चिंचवड : जात- पात ,धर्म न पाहता माणुसकीची जपणूक करणे , आपापसात बंधुभाव आणि सामाजिक सलोखा निर्माण करणे आहे. हा संदेश देत पिंपरी चिंचवड शहरांमध्ये निमित्त नमाज पठण करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरात बकरी ईद मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरी केली.

पिंपरी चिंचवड शहरात भोसरी,पिंपरी ,आकुर्डी ,चिंचवड, वाकड, पिंपळे गुरव, काळेवाडी , सांगवी , तळवडे, निगडी, ओटा स्कीम ,रूपी नगर , वाल्हेकर वाडी, नेहरूनगर, खराळवाडी , कासारवाडी , घरकुल , मोशी आदी भागातील मशीद व मद्रासी ईदगाह मैदानावर बकरी ईद आज सकाळी सात ते साडेनऊच्या दरम्यान तेथील मौलाना करवी नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी हीच मोठ्या उत्साहात साजरी केली .लहान मुला मुलींनी तसेच मुस्लिम बांधवांनी नवीन कपडे परिधान करून सुवासिक तेल व अत्तर लावून बकरी ईद निमित्त समुदायीक नमाज अदा केली. नमाज पठनानंतर सर्व ठिकाणी मुस्लिम बांधवांनी इच्छा एकमेकांना आलिंगन घालून ईदच्या शुभेच्छा दिल्या.

चिंचवड गाव येथील ईदगाह मैदानावर सकाळी साडेसात ते साडेनऊ दरम्यान नमाज पठण करण्यात आले . मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सामुदायिक नमाज पठण केले. पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस उपायुक्त सपना गोरे आदींनी यावेळी या परिसरात भेट दिली. ईदगाह मैदान येथे मौलाना इनामूल हक , मौलाना मीनहाज शेख यांनी मुस्लिम बांधवांना सामुदायिक नमाज पढविला. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर , यांच्या सत्कार युसुफ बऱ्हाणपुरे, इम्तियाज पानसरे ,इम्तियाज शेख यांच्या हस्ते करण्यात आला.

हेही वाचा –  पीसीसीओईमध्ये राज्यस्तरीय कॉर्फबॉल पंच मार्गदर्शन शिबिर

कार्यक्रमाचे संयोजन अध्यक्ष इम्रान पानसरे, पिंजारी, मतीन पानसरे , आसिफ शेख, हाजी अत्तार जी .ए. आदींनी केले यावेळी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार तसेच संधाचे पदाधिकारी इक्बाल काझी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

चिंचवड स्टेशन येथील जामिया गौशिया ट्रस्टच्या मशिदीत सकाकी साडेसात ते नऊच्या दरम्यान नमाज पठणासाठी मोठया संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते .यावेळी जेष्ठ नेते आझम पानसरे , निहाल पानसरे, ईशान सय्यद , माजी नगरसेवक अस्लम शेख, सादिक पठाण, अक्रम पानसरे, आदींनी संयोजन केले नमाज पठनानंतर ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांची मुस्लिम बांधवांनी भेट घेऊन त्यांना ईद च्या शुभेच्छा दिल्या.

मदरसा ए जामिया ट्रस्ट – वाल्हेकर वाडी , हुसेनी अरबी मदरसा चिंचवडे नगर , नूर ए इलाही जमात आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ वाल्हेकर वाडी चिंचवडअंजुमन तालीम कुराण दळवी नगर झोपडपट्टी चिंचवड सर्व धर्मीय स्मशानभूमी लिंक रोड पत्रा शेड , नूर ए इलाही आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ वाल्हेकरवाडी, हुसेन अरबी मदरसा, चिंचवडे नगर , मदरसा ए जामिया ट्रस्ट शिवाजी चौक ,वाल्हेकरवाडी आदी ठिकाणी नमाज पठण झाले असून ईदगाह मैदान या ठिकाणी मोठया संख्येने मुस्लीम बांधवाचा जनसमुदाय नमाज पठणास उपस्थित होता. सदर नमाज पठणच्या अनुषंगाने योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला होता

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button