डॉ.माधुरी अभिजीत दरेकर यांना संगणकशास्त्र विषयातील पीएचडी पदवी प्रदान
शिक्षण विश्व: माईर्स एमआयटी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागाच्या प्राध्यापकांचे यश

पिंपरी चिंचवड : माईर्स एमआयटी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. माधुरी अभिजीत दरेकर यांना एस जे जे टी विद्यापीठ जयपूर यांनी संगणकशास्त्र विषयातील पीएचडी पदवी प्रदान केली आहे
डॉ दरेकर यांनी “डिझाईन अ टूल टू अॅनालाईज द डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स यूज्ड इन म्युझिकल साँग्स बाय अप्लाईंग डिफरंट पॅरामिटर्स ऑफ डीप लर्निंग अल्गोरिदम्स” या विषयावर संशोधन केले आहे.
या संशोधनात त्यांनी डीप लर्निंग या प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून गाण्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध वाद्यांचे विश्लेषण करणारे एक अभिनव साधन विकसित केले आहे. या साधनाच्या माध्यमातून गाण्यातील विविध वाद्यांची ओळख व वर्गीकरण करण्यासाठी न्युरल नेटवर्क मॉडेल्सचा प्रभावी उपयोग करण्यात आला आहे.
हेही वाचा – पिंपरी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात
महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच सहकाऱ्यांनी डॉ दरेकर यांचे या यशाबद्दल अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या
संशोधन देणार महत्त्वपूर्ण योगदान
डॉ. दरेकर यांचे संशोधन कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगीत विश्लेषण या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण योगदान ठरत असून संगीत तंत्रज्ञान व बुद्धिमान ध्वनी ओळख प्रणालींच्या विकासासाठी हे संशोधन दिशादर्शक ठरणार आहे.




