डॉ. अविनाश चोरे यांना पीएच.डी. पदवी प्रदान
शिक्षण विश्व; भाषांतर तंत्रज्ञानात नवे योगदान
पिंपरी चिंचवड : एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील परीक्षा नियंत्रक व सहाय्यक प्राध्यापक डॉ. अविनाश गोधराम चोरे यांना नुकतीच पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली असून, त्यांच्या संशोधन कार्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि भाषिक तंत्रज्ञान क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.
डॉ. चोरे यांनी “डीप लर्निंग व मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करून व्यक्तीची भाषा ओळखून तिचे भाषांतर करणारे अभिनव मॉडेल डिझाईन व इम्प्लिमेंट” या विषयावर संशोधन केले आहे. त्यांनी विकसित केलेले मॉडेल ध्वनी, मजकूर आणि प्रतिमा या मल्टिमोडल इनपुट्सच्या आधारे व्यक्ती कोणती भाषा बोलत आहे हे ओळखते आणि ती भाषा तात्काळ अन्य भाषेत भाषांतरित करते.
हेही वाचा : कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्तांची प्रेरणा; शिवशंभो प्रतिष्ठानला “मोरया पुरस्कार” द्वितीय क्रमांकाने सन्मान
या तंत्रज्ञानामुळे विविध भाषिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींमध्ये संवाद अधिक सुलभ होणार असून, शैक्षणिक, प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
डॉ. चोरे यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, सहकारी व विद्यार्थी वर्गाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.




