पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात दिल्याचे समाधान; दिनेश यादव
‘गोधन वाटप उपक्रमा’तून सामाजिक बांधिलकी जपली

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आणि आमदार महेशदादा लांडगे यांच्या पुढाकाराने मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरलेला मोफत गोधन वाटप उपक्रम नुकताच राबविण्यात आला आहे.या उपक्रमात युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश यादव यांनीही सक्रिय सहभाग घेत गोधन दान करून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जपली. त्यांच्या पत्नी निशा यादव देखील या प्रसंगी उपस्थित होत्या.पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात दिल्याचे समाधान यातून मिळाल्याचे यादव यावेळी म्हणाले.
दिनेश यादव यावेळी म्हणाले, एक हात मदतीचा’ या संकल्पनेतून सुरु झालेल्या या उपक्रमाचा पहिला टप्पा जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्य कीट वाटपाने पार पडला. ५० हून अधिक गाड्यांमधून शेकडो पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्यात आला. आता दुसऱ्या टप्प्यात १०० हून अधिक गोधनाचे वाटप करण्यात येत आहे. या अंतर्गत गोपूजन भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र.चव्हाण, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे आणि शहराध्यक्ष शत्रुघ्नबापू काटे यांच्या उपस्थितीत पार पडले.
हेही वाचा : आस्मानी संकटात पिंपरी-चिंचवडकरांचा कायम ‘‘एक हात मदतीचा”
या उपक्रमांतर्गत यादव यांनी देवगाव खुर्द (ता. परांडा, जि. धाराशिव) येथील शेतकरी दत्तात्रय प्रभावती प्रभाकर चौधरी यांना गोदान करण्यात आले. पूरामुळे जगण्याचा आधार हरवलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी हा उपक्रम नवसंजीवनी ठरत आहे असे यादव म्हणाले.
महेशदादा लांडगे यांच्या या प्रयत्नाने केवळ गोधनच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकासाठी संवेदनशीलतेचे आणि सामाजिक जबाबदारीचे एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे.
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमात गोधन, चारा आणि मेडिकल कीटचे योगदान देण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे संस्कार म्हणजे संकटाच्या काळात समाजासोबत खंबीरपणे उभे राहणे आहे. या भूमिकेची प्रचिती या उपक्रमातून पुन्हा एकदा आली आहे.
– दिनेश यादव, अध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर.





