Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पूरग्रस्त बाळेवाडी, भालेवाडी आणि पोटेगाव ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर हसू फुलले!

आमदार लांडगे यांचे शिलेदार मदतीसह करमाळ्याच्या गावांमध्ये दाखल

शिवराज लांडगे यांच्या पुढाकारातून जीवनावश्यक मदतीचे वाटप

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

मराठवाड्याच्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या आपल्या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांचे खंदे शिलेदार मंडल अध्यक्ष शिवराज लांडगे तालुक्याच्या तीन गावांमध्ये मदतीसह दाखल झाले. जीवनावश्यक वस्तूंसह दिवाळीसाठी लागणाऱ्या गोष्टींचे वाटप शिवराज लांडगे यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलले.

मराठवाड्याच्या विविध भागात पावसाने निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतातील उभे पिके वाहून गेली, घरात पाणी शिरले आणि अनेक कुटुंबं उघड्यावर आली आहेत. दिवाळी जवळ येत असताना परिस्थिती अधिकच विदारक झाली होती.

या पार्श्वभूमीवर, आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी परिसरातील भारतीय जनता पक्षाच्या शिलेदारांनी मदतीचा ओघ सुरू करत पूरग्रस्त गावांमध्ये मदतीसह हजेरी लावली. अन्नधान्य, उबदार कपडे, फराळाचे साहित्य, मेणबत्त्या, सुकामेवा अशा आवश्यक वस्तू घेऊन शिलेदार गावोगावी पोहोचले.

हेही वाचा     :      “एक हात मदतीचा!” : सोलापूर पुरग्रस्तांच्या भावना; आपत्तीच्या काळात मानवतेचा दीप प्रज्वलित करणारा उपक्रम! 

शिवराज लांडगे एक ट्रक भरून साहित्य घेऊन बाळेवाडी भालेवाडी आणि पोटेगाव मध्ये शनिवारी हजर झाले. त्यांनी आणलेली मदत गावकऱ्यांनी अश्रूंच्या भरल्या डोळ्यांनी ही स्वीकारली. मदतीचा हा ओघ, समर्पण, शेतकऱ्यांप्रती असलेली सामाजिक बांधिलकी पाहून गावकरी अक्षरशः भारावले. यावेळी शिवराज लांडगे यांनी केवळ वस्तूंचे वाटपच केले नाही, तर ग्रामस्थांना धीर देत, संकटातून सावरण्यासाठी पाठबळही दिले.

दरम्यान यावेळी बाळेवाडी गावचे सरपंच नितीन हनुमंत लोंढे, उपसरपंच पानाचांद नलवडे , ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय निकम उपस्थित होते. भालेवाडी गावचे सरपंच गणेश सरडे , उपसरपंच पप्पू सरडे ,ग्रामसेवक काळे भाऊसाहेब तसेच पोटेगावचे सरपंच आशा अजिनाथ भागडे, उपसरपंच वैशाली हराळ, ग्राम विकास अधिकारी सुशेन ननवरे यावेळी उपस्थित होते.

ही केवळ मदत नाही, तर बळीराजाप्रती असलेली आपली सर्वांची जबाबदारी आहे. सप्टेंबर महिन्यात तुफान पाऊस बरसला. मराठवाड्यासह सोलापूर, करमाळा भागामध्ये मोठे नुकसान झाले. आपल्या सर्वांचा पोशिंदा आपला शेतकरी बांधव या नुकसानीची झळ सोसत आहे. शेती खरवडून निघाली आहे. दारात बांधलेले गोधन या पावसाने हिरावून घेतले. अशावेळी या सर्वांच्या मदतीला धावून जाणे हे कर्तव्य समजून आम्ही आज या गावांमध्ये आलो. आणि आपल्या बांधवांना सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

– शिवराज लांडगे, मंडल अध्यक्ष, इंद्रायणीनगर- भोसरी, भारतीय जनता पक्ष.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button