पिंपरी-चिंचवडला प्रखर हिंदुत्ववादी विकासाभिमूख नेता लाभला!
राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे गौरवोद्गार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला आमदार महेश लांडगे यांच्या रूपाने प्रखर हिंदुत्ववादी नेता मिळाला आहे. खरे तर आपल्यासाठी ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. आमदार लांडगे हे हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करीत असले, तरी सर्व समाज घटकांना एकत्र करून त्यांच्या सोबतीने शहरासाठी धडाडीने काम करत आहेत. त्यांच्या कामाचा धडाका पाहता शहर विकासाला चालना देऊन आमदार लांडगे शहराला नव्या उंचीवर नेतील, अशी मला खात्री आहे अशा भावना सप्तखंजिरीच्या माध्यमातून ग्रामस्वच्छतेचा संदेश देणारे श्री गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक तथा राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी व्यक्त केल्या.
भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात आमदार महेशद लांडगे यांच्या उपस्थितीत विदर्भ समाज मेळावा पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विदर्भातील व्यक्तींना विदर्भ समाज भूषण पुरस्कार देऊन (दि.17) गौरविण्यात आले. सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचा समाज प्रबोधन कीर्तनाचा कार्यक्रम हजारो विदर्भवासीयांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाला विदर्भ मित्र मंडळ माजी अध्यक्ष हरिभाऊ तांदळे, स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव भोंगाळे, भाजपा महिला चिटणीस कविता भोंगाळे, मंडल अध्यक्ष, रवींद्र नांदुरकर, कामगार नेते सचिन लांडगे, उद्योजक कार्तिक लांडगे, माजी नगरसेवक विकास डोळस, सागर गवळी, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य विजय फुगे, सामाजिक कार्यकर्ते कुलदीप परांडे, योगेश लोंढे आदी उपस्थित होते.
सत्यपाल महाराज म्हणाले की, अनिष्ट रूढी परंपरांच्या मुळावर घाव घालण्याचे काम मी करीत आलो. शिक्षणाची कास धरा आणि समाजाची प्रगती करा असा संदेश मी दिला. शहर विकासाला चालना देताना आमदार लांडगे यांनी प्रखर हिंदुत्वाची कास सोडलेली नाही.ही गोष्ट माझ्या दृष्टीने फार मोठी आहे. हिंदुत्वाचा प्रचार करताना सर्व समाज घटकांना एकत्र ठेवणे सोपे नाही. मात्र, आमदार लांडगे यांनी हे शिवधनुष्य पेलले आहे.
विदर्भवासियांची आमदार लांडगे यांना साथ…
विदर्भातील समाज बांधवांनी एकी दाखवत आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांना पुन्हा प्रचंड मताधिक्याने निवडून आणायचा निर्धार केला. पिंपरी-चिंचवड शहर आणि औद्योगिक पट्टयात विदर्भातून नोकरी-व्यावसायाच्या निमित्ताने स्थायिक झालेल्या नागरिकांनी संख्या मोठी आहे. सर्वसमाज घटकांना सोबत घेवून जाणारे आमदार लांडगे यांच्या पाठीशी ठामपणे राहू, असा संकल्प या मेळाव्यात करण्यात आला.





