उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला पोलिसांच्या कामाचा आढावा

पिंपरी : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयामध्ये कोणकोणती कामे झाली आहेत, पोलिस ठाण्यांच्या इमारती, पोलिस भरती, वाहनांची संख्या, गुन्ह्यांची संख्या या सर्व गोष्टींचा आढावा घेतला. त्यानंतर पोलिस आयुक्तांचे अभिनंदन करून पिंपरी- चिंचवडकरांना अभिमान वाटणारे काम करत राहण्याचा सल्ला दिला.
जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाला ५७ चारचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या वाहनांचे लोकार्पण उपमुख्यंमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या ‘स्थायी आदेश’ या पुस्तकाचे प्रकाशन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
हेही वाचा – भारताचा अनमोल ‘रत्न’ हरपला! जाणून घेऊयात रतन टाटांची थोडक्यात कारकीर्द
पोलिस आयुक्तालयाला मिळालेल्या ५७ वाहनांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यत्र्यांनी पोलिस आयुक्तालायाच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर पोलिसांच्या कामाचे त्यांनी कौतूक केले. तसेच, काही गोष्टींमध्ये विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत.
– विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड





