सैफ अली हल्ला प्रकरण : मुंबई पोलिसांचे १००० पानांचे आरोपपत्र, महत्त्वाचे पुरावे सापडले

Saif Ali Khan attack : सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वांद्रे न्यायालयात १००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपी शरीफुल इस्लामविरुद्ध अनेक पुरावे त्यात समाविष्ट करण्यात आले आहेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपपत्रात फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाचाही उल्लेख करण्यात आला आहे. अहवालात म्हटले आहे की, घटनास्थळी सैफ अली खानच्या आणि आरोपीच्या बॉडीवरून सापडलेले चाकूचे तुकडे एकाच चाकूचे तीन तुकडे आहेत.
हेही वाचा – ‘पुणे-पीसीएमसी मेट्रो’ नामविस्ताराची मागणी; आमदार शंकर जगताप यांनी सुचवले दोन नवीन मेट्रो मार्ग
तसेच, आरोपपत्रात आरोपीच्या डाव्या हाताच्या बोटांच्या ठशांच्या अहवालाचा उल्लेख आहे. यापूर्वी २९ मार्च रोजी सैफ अली खानवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादने मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
आरोपीने असा दावा केला होता की त्याच्याविरुद्ध खोटा खटला दाखल करण्यात आला आहे आणि त्याला गोवण्याचा कट रचला जात आहे.