ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संसर्गजन्य रुग्णांचे प्रमाण वाढले; उपाययोजना करा!

भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांची मागणी

महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांना निवेदन

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड संसर्गजन्य आजाराचे वाढते रुग्ण पाहता महापालिका दवाखान्यांत स्वतंत्र यंत्रणा आणि उपाययोजना कराव्यात. नागरी आरोग्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेसह राज्यभरात संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सर्दी, ताप, खोकला आदींसारख्या त्रासाने रुग्ण त्रस्त आहेत. नुकतेच कोरोना सारख्या महामारीतून जग सावरत आहे. शासनाने योग्य खबरदारी घेतल्यामुळेच या महामारीचा सामना करता आला. त्या पद्धतीची खबरदारी शासनाकडून सध्या अपेक्षीत आहे.

हेही वाचा – ‘पंकजा मुंडे यांनी आता विचार करावा आणि योग्य निर्णय घ्यावा’; राष्ट्रवादीच्या नेत्याचा सल्ला 

राज्यात कोरोनाच्या आजाराचे वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. यासह संसर्गजन्य आजाराचे रुग्ण असलेले प्रमाण देखील वाढत आहे. मध्यंतरी डोळ्यांची साथ आली होती. शहरातील मासुळकर कॉलनी येथे रुग्ण गर्दी करत आहेत. या आजारांना आळा घालायचे असल्यास वैद्यकीय योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. शहरातील मोठी रुग्णालये तसेच दवाखान्यात उपचारासाठी रुग्ण मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. रुग्णांची संख्या पाहता शासकीय यंत्रणा देखील तोकड्या पडत आहेत. त्याचा परिणाम रुग्ण सेवेवर होत आहे. ही यंत्रणा वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही दीपक मोढवे-पाटील यांनी म्हटले आहे.

शहरात ठिकठिकाणी कॅम्प राबवा..

पिंपरी-चिंचवड महापालिकेची मोठी आठ रुग्णालये आहेत. या बरोबरच प्रभागात अनेक ठिकाणी दवाखाने देखील आहेत. या रुग्णालये आणि दवाखान्यात अधिकच्या कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती करावी. तसेच सर्दी, ताप, खोकला आदी सारख्या संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र आरोग्य कॅम्प राबवावा. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या इतर रुग्णांना त्याचा त्रास होणार नाही. तसेच या आजाराच्या रुग्णांवर योग्य उपचार होऊन त्याचा त्यांना फायदा होईल. याबाबत त्वरित कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणीही दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button