Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रिंग रोडचे भूसंपादन तातडीने पूर्ण करा, महानगर आयुक्तांनी केल्या सूचना

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) विकसित करण्यात येत असलेल्या बाह्यवर्तुळाकार रस्त्याचे (रिंगरोड) भूसंपादन तातडीने पूर्ण करावे. त्याचबरोबर रिंग रोडशी संबंधित कामातील सर्व प्रक्रिया सुरू करण्यात याव्यात, अशा सूचना महानगर आयुक्त योगेश म्हसे यांनी दिल्या.

रिंग रोड आणि संबंधित कामाची माहिती घेण्यासाठी पीएमआरडीएच्या आकुर्डी कार्यालयात महानगर आयुक्त योगेश म्हसे यांनी नुकतीच अभियांत्रिकी विभागाची आढावा बैठक घेतली. रिंग रोड प्रकल्पासह इतर विकास प्रकल्पांवर देखील बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालयातील भूसंपादन अधिकारी उपस्थित होते. याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

हेही वाचा –  विधानसभा अध्यक्षपदी नार्वेकरांना पुन्हा संधी?

पीएमआरडीएच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या रिंग रोड कामाचे टप्पानिहाय नियोजन केले आहे. १२८ किलोमीटर लांबीचा रस्ता सोळू येथून सुरू होतो. या रस्त्याचे पीएमआरडीएकडून ८३.१२ किलोमीटर अंतरातील काम केले जाणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात सोळू ते वडगाव शिंदे या ४.७० कि.मी. रस्त्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी ४०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या कामावर दरवेळी चर्चा होते. मात्र, प्रत्यक्षात त्यावरती अंमलबजावणी होत नाही. ही वस्तुस्थिती समोर आल्यानंतर महानगर आयुक्त म्हसे यांनी पुढील कार्यवाहीसंदर्भात अभियांत्रिकी व भूसंपादन विभागाला सक्त सूचना दिल्या.

रिंग रोडच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी लवकर भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले. सोळू ते वडगाव शिंदे आणि पुणे-अहमदनगर रस्ता ते पुणे-सातारा रस्ता या दरम्यान ३२ किलोमीटर अंतरात देखील भूसंपादन प्रक्रिया केली जाणार आहे. याबाबतचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविलेले आहेत. त्याविषयी बैठकीत चर्चा झाली. अद्याप रिंग रोड संदर्भात जागा ताब्यात नसल्याने त्यावरती कोणतीही कार्यवाही होऊ शकत नाही. तत्कालीन आयुक्त राहुल महिवाल यांनी शेतकऱ्याची बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. मात्र, त्यानंतर प्रत्यक्षात कोणती कारवाई झाली नाही. तसेच, जिल्हाधिकाऱ्याकडून भूसंपादन प्रक्रिया देखील रखडलेली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button