Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विधानसभा अध्यक्षपदी नार्वेकरांना पुन्हा संधी?

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदासाठी कुलाबा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार राहुल नार्वेकर यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजपने नार्वेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची सूत्रांची माहिती आहे. रविवारी नार्वेकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते.

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी सोमवारचा दिवस नक्की करण्यात आला आहे. त्यासाठी रविवारी दुपारी बारापर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. 288 सदस्यांच्या सभागृहात महायुतीकडे 237 जणांचे संख्याबळ आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा विजय नक्की आहे. महायुतीच्या जागावाटपात विधानसभेचे अध्यक्षपद भाजपकडे असणार आहे. त्यानुसार भाजपने पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याच नावाला पसंती दिल्याचे समजते.

हेही वाचा –  ‘किमान ज्येष्ठांनी तरी दिशाभूल करू नये’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिंदे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळातही राहुल नार्वेकर यांच्याकडेच विधानसभेचे अध्यक्षपद देण्यात आले होते. या कार्यकाळात नार्वेकर यांचा वकिली पेशातील अनुभव सत्ताधारी महायुतीच्या कामी आला होता. विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या दावेदारीवरील सुनावणीत नार्वेकरांच्या अनुभवाचा फायदा सत्ताधार्‍यांना मिळाला. त्यामुळे नव्या विधानसभेतही अध्यक्षपद नार्वेकरांकडेच सोपविण्याचा भाजपचा मानस आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button