आंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

तुर्कस्तान भूकंपाने हादरलं, तुर्कस्तानमध्ये 5.2 रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

तुर्कस्तानचं जनजीवन विस्कळीत

आंतरराष्ट्रीय : मोठी बातमी समोर येत आहे, आहे. तुर्कस्तानमध्ये 5.2 रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. तुर्कीची जमीन पुन्हा एकदा हादरली आहे. तुर्कस्तान वारंवार भूंकपाने हादरत आहे. तुर्कस्थानमध्ये कधी सौम्य तर कधी प्रचंड तीव्रतेचे भूंकप यापूर्वी देखील आले आहेत. काही भूकंपांची तीव्रता एवढी प्रचंड होती की, त्यामुळे तुर्कस्तानचं जनजीवन विस्कळीत झालं.

दरम्यान यापूर्वी 6 फेब्रुवारी 2023 ला देखील तुर्कस्थानामध्ये प्रचंड तीव्रतेचा भूकंप आला होता. 7.5 रिस्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप होता, या भूकंपामध्ये तुर्कस्थानासोबतच सिरीयाचं देखील मोठं नुकसान झालं होतं. हा तुर्कस्तानच्या इतिहासामधील सर्वात मोठा असा भूकंप होता, या भूकंपामध्ये पन्नास हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता, तसेच प्रचंड प्रमाणात वित्तहानी झाली होती. त्यापूर्वी 2020 मध्ये देखील तुर्कस्थानमध्ये मोठा भूकंप झाला होता.

हेही वाचा-  निमगाव भोगीत प्रदूषणाचा विळखा: ग्रामस्थांची शरद पवार, उदय सामंत यांच्याकडे न्यायाची मागणी

तुर्कस्तानावर बहिष्कार

भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला होता, पाकिस्तानने देखील भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतानं पाकिस्तानचा हा हल्ला परतून लावला, पाकिस्तानने ड्रोन हल्ल्यासाठी जे ड्रोन वापरले होते, ते तुर्कीचे होते. तुर्कीनं भारत -पाकिस्तान वादात उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला, त्यानंतर आता भारताकडून तुर्कीच्या आर्थिक नाड्या आवळण्यात आल्या आहेत. भारतीय व्यापाऱ्यांकडून तुर्कीच्या मालावर बहिष्कार घालण्यात आला आहे. तुर्कीच्या सफरचंदावर भारतामध्ये बहिष्कार घालण्यात आला आहे, यामुळे तुर्कीला मोठा दणका बसला आहे, दुसरीकडे बॉलिवूडने देखील तुर्कीमध्ये होणाऱ्या चित्रिकरणाला बॅन केलं आहे. इथूनपुढे तुर्कीच्या भूमीवर कोणत्याही चित्रपट आणि मालिकांचं चित्रिकरण होणार नाही अशी भूमिका भारतीय चित्रपट व्यावसायिकांकडून घेण्यात आली आहे.

भारतानं तुर्कीवर घातलेल्या बहिष्कारामुळे तुर्कस्थानला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भारतातून दरवर्षी लाखो पर्यटक तुर्कीला जातात मात्र तुर्कीनं घेतलेल्या या भूमिकेमुळे आता पर्यटकांनी देखील तुर्कस्थानकडे पाठ फिरवली आहे. यामुळे तुर्कीला प्रचंड नुकसान होणार आहे, मोठा फटका बसला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button