पिंपळे सौदागर येथे दुचाकीस्वार तरुणाच्या बॅगेत सापडली १५ लाखाची रोकड
परदेशी चलनाची दोन लाखाची रोकडही पकडली

पिंपरी चिंचवड : पिंपळे सौदागर येथील कुंजीर चौकात दुचाकीवरून चाललेल्या तरुणाच्या बॅगेत 15 लाखाची रोकड सापडली. त्यामध्ये परदेशी चलनाच्या दोन लाख तर हिंदुस्थानी चलनातील बारा लाख रुपयांची रोकड सांगवी पोलिसांनी जप्त केली.
सांगवी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी याबाबत माहिती दिली. सध्या पिंपरी – चिंचवड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पिंपळे सौदागर येथील कुंजीर चौकात बंदोबस्तावर असलेल्या सांगली पोलिसांना एक संशयित दुचाकी जाताना दिसली. पोलिसांनी त्याला अडविले.
हेही वाचा – ‘लाडक्या बहिणींची मकरसंक्रांत होणार गोड’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
त्याच्या खांद्यावर असलेल्या बॅगची पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये परदेशी चलनाच्या दोन लाख तर हिंदुस्थानी चलनातील १२ लाख रुपयांची रोकड आढळून आली. पोलिसांनी ही रोकड जप्त केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपला फॉरेन करन्सी एक्सचेंजचा व्यवसाय असल्याचे सांगितले.
सांगवी पोलिसांकडून परकीय चलन विभागाच्या आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी पडताळणी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती कोळी यांनी दिली.





