ब्रेकिंग न्यूज : राष्ट्रवादीचे पिंपरी विधानसभा आमदार आण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला आहे. ही घटना आज (बुधवारी, दि. 12) दुपारी एक वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळ घडली.
तानाजी पवार असे संशयित आरोपीचे नाव असल्याचे समजते. आरोपीने पिस्तूलातून चार गोळ्या झाडल्या आहेत. पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पिस्तूलातून गोळी झाडली. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित हल्ला ठेकेदारीच्या वादातून झाला असून शहरातील कचरा संकलीत करणा-या ठेकेदाराच्या कर्मचा-याने गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्याच्या पाठीमागील खरा सुत्रधार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलीस तपास करीत आहेत.





